अवघ्या दीड वर्षातच दोन मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मुख्यमंत्री ठाकरेंवर नामुष्की

ती ठाकरे सरकारमधील पहिले विकेट होती.
In just year and  half, two ministers in the Thackeray government had to resign
In just year and half, two ministers in the Thackeray government had to resign

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांची १५ दिवसांत चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायलयाने सोमवारी (ता. ५ एप्रिल) सकाळी सीबीआयला दिला. त्यानंतर देशमुख यांनी तातडीने दुपारी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकारला अवघ्या दीड वर्षातच आपल्या दोन मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे आणि ही एक प्रकारची नामुष्की समजली जाते. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची पंधरा दिवसांत चौकशी करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर नैतिक मुद्द्याच्या आधारावर गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

तत्पूर्वी देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय बोलून दाखविला. त्यास पवार यांनी होकार दर्शविला, त्यानंतर देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परमबीर सिंह यांनी आरोप केल्यानंतर आम्ही निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमली होती. मात्र, उच्च न्यायालयाने आज सीबीआय चौकशीचा आदेश दिल्याने देशमुख यांनी हे पाऊल उचलले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

गृहमंत्री देशमुख यांच्या रूपाने ठाकरे सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट पडली आहे. त्याअगोदर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती ठाकरे सरकारमधील पहिले विकेट होती.

शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर बीडमधील पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोप झाला होता. सुरुवातील त्यांनी या प्रकरणी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले होते. मात्र, राजकीय दबाव वाढल्यानंतर वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा २८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो राज्यपालांकडे सुपूर्द केला होता. राजीनामा देतेवेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप करत आपली आणि समाजाची बदनामी केली जात असल्याचे म्हटले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com