सरकारला वीज बीलांची वसुली सावकारासारखी करायची आहे!

शेतकरी असो वा सामान्य माणुस तो अडचणीत आहे. अशा स्थितीत त्याला मदतीची गरज आहे. मात्र सरकार त्याला मदत करण्याऐवजी वीजबीलांची थकबाकीचा बाऊ करत आहे.
सरकारला वीज बीलांची वसुली सावकारासारखी करायची आहे!
Devendra Fadanvis

नागपूर : शेतकरी असो वा सामान्य माणुस (Farmers & Ordinery citizens) तो अडचणीत आहे. अशा स्थितीत त्याला मदतीची गरज आहे. (They need help) मात्र सरकार त्याला मदत करण्याऐवजी वीजबीलांच्या थकबाकीचा बाऊ करत आहे. (But government create fear) राज्य सरकार सावाकारासारखी वसुली करीत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis) यांनी केला आहे. 

ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील वीजेची किती थकबाकी वाढली?. याची माहिती घेताना त्याचा विविध प्रकारे विचार करावा लागतो. विशेषतः कृषी पंपांची थकबाकी दाखविताना त्यात क्रॅास सबसिडी दाखवतो. विविध प्रकारचे नुकसान होते. ते भरून काढण्यासाठी आपण वीजेवर आकारल्या जाणाऱ्या वीजेच्या आकारणीतून ती भरून काढतो. त्यामुळे मला असे वाटते की, जबरदस्तीने वसुल करण्यासाठी थकबाकीचा बाऊ तयार केला जातो आहे.

ते म्हणाले, शेतकरी असो, की सामान्य नागरिक असो सर्वच अत्यंत अडचणीत आहेत. अशा स्थितीत त्याला मदत करण्याएैवजी राज्य सरकारला त्याच्याकडून जबरण वसुली करायची आहे. सावकारासारखी वसुली करायची आहे.   म्हणून हे सगळे नाटक सुरु आहे. 

ओबीसी आरक्षणाबाबत ते म्हणाले, निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्याला सामोरे जाऊ. मात्र सरकार जे बोलते, ते कृतीत आणत नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले यांनी नुकतेच राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यावर राज्य सरकारने सध्याचे अॅडव्होकेट जनरल कुंभकोणी यांना बदलले पाहिजे होते. कारण त्यांची नेमणूक यापूर्वीच्या सरकारने केली होती. त्यांची भूमिका संशयास्पद आहे. याबाबत श्री. फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिले पाहिजे.  कारण अॅडव्होकेट जनरल यांना मुख्यमंत्री नियुक्त केले आहे. तो मुख्यमंत्र्यांचा पेरोगेटीव्ह आहे. त्यामुळे ते मागच्या सरकारचे कंटीन्यू झालेले नाहीत. सध्याच्या सरकारने त्यांना पुन्हा नियुक्ती दिली आहे. त्याला राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. 

लावणी सम्राज्ञी सुरेख पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी केलेल्या विधानाने महिलांचा अवमान झाल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. याविषयी ते म्हणाले, यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याविषयी स्पष्टीकरण केले आहे. श्री. दरेकर जे बोलले, ते बोली भाषेत बोलले आहेत. त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाने हे काही योग्य नाही. 
...

हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in