फडणवीसांचा लॉकडाऊनला विरोध; तर पंकजा विचारतात पर्याय काय?

सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविणारे ट्विट केले आहे.
Fadnavis opposes lockdown; So Pankaja munde asks what is the alternative?
Fadnavis opposes lockdown; So Pankaja munde asks what is the alternative?

मुंबई  ः राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात वेळी बैठकीत लॉकडाऊन लावणार असाल अगोदर सर्वसामान्य लोकांचा विचार करा, ज्यांचं हातावर पोट आहे, अशा लोकांसाठी पॅकेज जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नेमके उलटे मत व्यक्त करत सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविणारे ट्विट केले आहे.   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन बैठकीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह राज्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा राहील, अशी भूमिका महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांनी घेतली. संसर्ग रोखण्यासाठी आपल्याकडे राज्यात कडक लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या संदर्भातील निर्णय येत्या दोन दिवसांत टास्क फोर्सशी चर्चा करून मुख्यमंत्री घेणार आहेत.

तत्पूर्वी बैठकीत भूमिका मांडताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करणार असाल तर आधी राज्यातील जनतेचा विचार करा. ज्यांची पोटं हातावर आहेत, त्यांच्यासाठी अगोदर एखादे पॅकेज जाहीर करा, अशी मागणी केली. लॉकडाऊन करताना सर्वंकष विचार न करता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला तर उद्रेक होईल, असे फडणवीस यांनी बैठकीत म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षीय बैठक सुरू असताना नेमके त्याचवेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केले आणि ते नेमकी सरकारच्या भूमिकेशी साम्य सांगणारे होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या त्या ट्विटची एकच चर्चा सुरू आहे. त्या ट्विटमध्ये पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, “Lockdown मुळे जरी गरिबांची, व्यापाराची, economy ची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय आहे??Coronaची साखळी कशी तोडणार??मजूर आणि उद्योजकांना, नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणा वरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे”. 

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लावण्याचे निश्चित आहे. त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्सशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा निर्णय घेणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com