देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी

प्रबोधिनीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे होती.
Devendra Fadnavis elected as President of Rambhau Mhalgi Prabodhini
Devendra Fadnavis elected as President of Rambhau Mhalgi Prabodhini

मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (ता. 13 मार्च) निवड करण्यात आली. या प्रबोधिनीच्या उपाध्यक्षपदाची धुरा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ही माहिती प्रबोधिनीच्या वतीने ट्‌विटद्वारे देण्यात आली. 

मुंबईत शनिवारी झालेल्या प्रबोधिनीच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे यांची, सचिवपदी भाई गिरकर यांची आणि कोषाध्यक्षपदी अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली आहे. प्रबोधिनीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने या जागी फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक परिषदेशी (इकॉनॉमिक कौन्सिल) संलग्न रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 1982 पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते तसेच स्टार्ट अप यांच्या कौशल्य विकासासाठी काम करणारी ही संस्था आहे. तसेच, विविध विषयांवर जनजागृती करण्याचे कामही प्रबोधिनी करते. 

संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेद्वारे विशेष सल्लागार दर्जा मिळालेली म्हाळगी प्रबोधिनी ही संपूर्ण दक्षिण आशिया व दक्षिणपूर्व आशियातील एकमेव संस्था आहे. 


हेही वाचा : अजित पवारांच्या कारखान्यांना ऊस मिळावा; म्हणून "सोमेश्‍वर'चे विस्तारीकरण रखडवले 

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : बारामती तालुक्‍यातील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणास सभासदांनी फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या वार्षिक सभेत परवानगी दिली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कारखान्यांना ऊस मिळावा, यासाठी विस्तारीकरणाचा गोंधळ सुरू आहे. त्यावेळच्या प्रस्तावानुसार 112 कोटींमध्ये काम झाले असते. आता विस्तारीकरणासाठी दीडशे ते दोनशे कोटींचे नवीन कर्ज होणार आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप खैरे आणि कारखान्याचे माजी संचालक पी. के. जगताप यांनी केला. 

चालू हंगामात गाळप करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याकडे तेरा ते चौदा लाख टन उसाच्या नोंदी झाल्या होत्या. त्यातील सव्वाआठ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. अद्याप पाच लाख टन ऊस गाळपाअभावी उभा आहे. आगामी हंगामातही प्रचंड ऊस असताना विस्तारीकरण लांबत आहे. या पार्श्वभूमीवर खैरे, जगताप, बाळासाहेब भोसले, आदिनाथ सोरटे, विठ्ठल पिसाळ, खलिल काझी, शंकर दडस आदींनी कारखान्याला निवेदन देत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com