Demand for money from Facebook using a photo of Minister Yashomati Thakur; Filed a crime against anonymity | Sarkarnama

 मंत्री यशोमती ठाकूर यांचा फोटो वापरून फेसबुकवरून पैशांची मागणी; गुन्हा दाखल 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 जुलै 2020

तीन दिवसांपुर्वी मंत्री ठाकूर यांना एका परिचित व्यक्तीने फोन करून माहिती दिली की, फेसबुकवर " एसबीए ग्रॅन्ट ऑफर ' नावाचे पेज असून त्यावर तुमचे छायाचित्र वापरले आहेत.

अमरावती : "एसबीए ग्रॅन्ट ऑफर' नावाचे पेज तयार करून त्यावर महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे छायाचित्र वापरले आहे. याच पेजवरून एक व्यक्ती मॅसेज पाठवून पैशाची मागणी करत असल्याची तक्रार मंत्री ठाकूर यांच्याकडे आली होती.

या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

तीन दिवसांपुर्वी मंत्री ठाकूर यांना एका परिचित व्यक्तीने फोन करून माहिती दिली की, फेसबुकवर " एसबीए ग्रॅन्ट ऑफर ' नावाचे पेज असून त्यावर तुमचे छायाचित्र वापरले आहेत. तसेच संबधित व्यक्तीने पैशाची मागणी केली आहे. त्याबाबतचा स्क्रिनशॉटसुद्धा संबंधिताने पालकमंत्र्यांना पाठवला.

विषयाचे गांभीर्य लक्षात घेता मंत्री ठाकूर यांनी तत्काळ संबधित पेजबाबत शिरीष गवळी यांना पाहणी करून माहिती घेण्यास सांगितले. त्यामुळे गवळी यांनी संबधित पेजवर जावून पाहिले असता "एसबीए ग्रॅन्ट ऑफर' नावाचे पेज आहे. 

तसेच मंत्री ठाकूर यांना परिचिताने या पेजबाबत स्क्रिनशॉट पाठवला त्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये चॅटींग झाल्याचे दिसले. त्यामध्ये रोहिदास राकेश नामक व्यक्तीने हा मॅसेज केला असून इतरांनाही तोच मॅसेज करत असल्याचे लक्षात आले. रोहीदास राकेशने डायरेक्‍टर इन चार्ज ऑफ "एसबीए ग्रॅन्ट ऑफर' असे नमूद केले आहे.

मंत्री ठाकूर यांचे नाव व छायाचित्र वापरून दुरूपयोग करून रोहीदास राकेश नामक व्यक्ती लोकांना वेबपेजवरून मॅसेज करून पैशाची मागणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली असल्याने त्यावरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असल्याची माहिती गाडगे नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली.
 
Edited by Prakash Patil

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख