सोनिया गांधींच्या घराबाहेरच उदयनराजे अन् नाना पटोलेंची भेट...

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नाना पटोले आज पहिल्यांदाच दिल्लीला गेले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली.
Congress state president Nana Patole meets MP UdayanRaje Bhosle
Congress state president Nana Patole meets MP UdayanRaje Bhosle

नवी दिल्ली : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नाना पटोले आज पहिल्यांदाच दिल्लीला गेले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधींना भेटून आल्यानंतर पटोले यांना अचानक खासदार उदयनराजे भेटले. उदयनराजेंनी त्यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले दिल्ली यांनी आज दिल्लीत खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. त्यांना भेटून बाहेर आल्यानंतर खासदार उदयनराजे यांची भेट झाली. उदयनराजे पटोले यांना शुभेच्छा देण्यासाठी सोनिया गांधींच्या घराबाहेरच थांबले. काही मिनिटेच ही भेट झाल्यानंतर उदयनराजे पटोलेंना शुभेच्छा देऊन निघून गेले.

दरम्यान, नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. ते शुक्रवारी (ता. १२ फेब्रुवारी) रोजी दुपारी २.३० वाजता ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत. प्रदेशाध्यपदाचा पदभार स्वीकारण्याचा जाहीर कार्यक्रम अनेक वर्षात प्रथमच होत आहे.

पदभार स्वीकारण्यापूर्वी पटोले आज दिल्लीत पोहचले. निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच दिल्लीला गेले आहेत. त्यांनी खासदार राहुल गांधी यांची भेट घेत नियुक्तीबद्दल आभार मानले. काही वेळात ते दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनालाही भेट देणार आहेत. 

ऐतिहासिक क्रांती मैदानावर स्वीकारणार पदभार

दरम्यान, अॉगस्ट क्रांती मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दु. आ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नाना पटोले यांनी  (४ फेब्रुवारी) रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या नंतर (५ फेब्रुवारी रोजी) काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. त्यानुसार आता ते (ता. १२ फेब्रुवारी) रोजी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष व उपाध्यक्षही पदभार स्वीकारणार आहेत. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com