जयंतरावजी...यवतमाळमधील दारुबंदीचे काय झाले : चित्रा वाघांचा खडा सवाल 

महिलांच्या भावनांशी खेळलात, तर घरी बसून चूल फुंकण्याची वेळ येईल.
Chitra Wagh criticizes the Mahavikas Aghadi government for lifting the ban on alcohol in Chandrapur
Chitra Wagh criticizes the Mahavikas Aghadi government for lifting the ban on alcohol in Chandrapur

मुंबई : चंद्रपूरची दारुबंदी उठवण्याच्या प्रश्नावरून भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड, चित्रा वाघ आदींनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. यवतमाळला दारुबंदी करण्याचे काय झाले, असे जयंत पाटील यांना विचारतानाच महिलांच्या भावनांशी खेळलात, तर घरी बसून चूल फुंकण्याची वेळ येईल, असा टोला वाघ यांनी लगावला. (Chitra Wagh criticizes the Mahavikas Aghadi government for lifting the ban on alcohol in Chandrapur)

राज्यात देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असताना जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना आमचे सरकार आले तर यवतमाळमध्ये दारुबंदी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची आठवण त्यांना करून देताना क्या हुवा तेरा वादा....जयंतरावजी, असे श्रीमती वाघ यांनी विचारले आहे. आमचे सरकार आल्यावर पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत यवतमाळला दारूबंदी करणार, असे आश्वासन विधानसभेत देणारा पाटील यांच्या भाषणाचा व्हिडियोदेखील त्यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.

यवतमाळ राहिले दूर, उलट चंद्रपुरचीच दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने. महिलांना कमी समजू नका, अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात, तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे. 

मुंबईत शंभर कोटींचे हप्ते मिळणे बंद झाले म्हणून चंद्रपुरात दारुबंदी उठवली का, असा बोचरा प्रश्न विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी विचारला आहे. लाड यांनी या प्रश्नावर समाज माध्यमांवर व्हिडियो प्रसारित करून या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. महिलांना या सरकारकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नाही. अवैध दारुविक्री रोखण्यासाठी दारुबंदी उठवणे, यात कसला शहाणपणा आहे. हा हप्तेखोरीचा नवा पायंडा आहे का, अशी टीकाही लाड यांनी केली आहे. मुंबईत देशमुखांचे दुकान बंद झाले आणि वडेट्टीवारांनी चंद्रपुरात नवे दुकान सुरु केले, हा लज्जास्पद प्रकार आहे. व्यसनांविरुद्ध लढा देणाऱ्या आर. आर. आबांचा तरी विचार करायचात, बेवड्यांचे सरकार या कुकीर्तीपासून अजूनही बचाव करा, असा टोलाही लाड यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com