गरीबाच्या लेकराला बोलु द्या महाराज!

"हा काय प्रकार आहे. एक तर आम्हाला वरच्या गॅलरीत बसवले. लॅपटॉप दिले नाहीत. निवडून येऊ देत नाही. निवडून आलो तर बोलू देत नाही. गरीबाच्या लेकराला बोलु द्या महाराज!' अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केल्याने तणाव असलेले विधानसभा सभागृहातील वातावरण हलके झाले.
Kishor Jorgewar
Kishor Jorgewar

मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाषणात भाजपचे सदस्य अडथळे आणत होते. त्यावर आमदार जोरगेवार यांनी, "हा काय प्रकार आहे. एक तर आम्हाला वरच्या गॅलरीत बसवले. लॅपटॉप दिले नाहीत. निवडून येऊ देत नाही. निवडून आलो तर बोलू देत नाही. गरीबाच्या लेकराला बोलु द्या महाराज!' अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केल्याने तणाव असलेले विधानसभा सभागृहातील वातावरण हलके झाले. 

यावेळी आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनासह विविध प्रश्‍नांवर शासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, राज्यपाल चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. ताडोबा अभयअरण्यात मुक्काम केला. त्यामुळे वाघांच्या संवर्धनाकडे लक्ष वेधले गेले. वाघांचे संवर्धन होण्यास त्याची मदत होईल. त्यासाठी त्यांचे चंद्रपूरवासीयांच्या वतीने आभार. मात्र करतानाच चंद्रपूर जिल्ह्यात प्रयटनास अतिशय अनुकुल वातावरण आहे. त्याकडे लक्ष दिले तर येथील पर्यटनाला चालना मिळेल. 

भाजपचे आशीष शेलार यांनी पिठासीन अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेत सत्ताधारी व विरोधकांचे दोनदोन सदस्य बोलतील असे ठरले होते. मात्र सत्ताधारी दोघे बोलल्यावर आता तिसऱ्या सदस्याला संधी दिली आहे. हे योग्य नाही. यामध्ये आमच्या जगजीतसिंह रामा यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार केली. यावर आमदार जोरगेवार म्हणाले, "गरीबाच्या लेकराला बोलु द्या महाराज!' 

ते पुढे म्हणाले, राज्याच्या पर्यटनमंत्र्यांनी देखील चंद्रपूरचा दौरा करावा. येथील प्राचीन मंदिर संवर्धन योजनेत या जिल्ह्याचा विचार करावा. या जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. आज येथे बेचाळीस टक्के जंगल प्रदूषीत झाले आहे. आम्ही राज्याला प्रकाशमान करणारी तीस टक्के सर्वाधीक प्रदूषीत औष्णिक वीजेची निर्मिती करतो. मात्र त्यात स्थानिक नागिरकांना काहीही सुट मिळत नाही. येथील नागिरकांना घरगुती वापराची दोनशे युनिट वीज मोफत मिळावी. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com