तुमचा देशमुख, भुजबळ करून टाकू, अशी आमदार जाधव यांना धमकी दिली कोणी, पटोले संतापले

अशा गुंड प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा. यामागील सुत्रधार कोण, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी संबंधित प्रकाराची चौकशी केली जाईल, असे सांगितले.
तुमचा देशमुख, भुजबळ करून टाकू, अशी आमदार जाधव यांना धमकी दिली कोणी, पटोले संतापले
Nana patole.jpg

मुंबई ः रावसाहेब दानवेंचे (Ravsaheb Danve) सहाय्यक आणि माजी खासदार संजय काकडे यांचे फोन टॅब होत होते. पाळत ठेवण्यासाठी फोन नंबर टॅब करण्यात आला. माझ्यासाठी अमजत खान हा कोड ठेवण्यात आला होता. तुमचा अनिल देशमुख, भुजबळ करून टाकू, अशी धमकी आमदार भास्कर जाधव यांना दिली, असा आरोप आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत केला. (Someone threatened MLA Jadhav to make Anil Deshmukh, Bhujbal, Patole got angry)

अशा गुंड प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा. यामागील सुत्रधार कोण, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी संबंधित प्रकाराची चौकशी केली जाईल, असे सांगितले.

कोणाचे फोन टॅब होत असतील, तर हे भयावर आहे. लोकशाहीच्या मंदिरात आपण उभे आहोत. ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. याची चौकशी व्हावी. कोणाकोणाचे फोन टॅब झाली, याची चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी. हा लोकशाहीचा धडधडीत खून आहे, असा आरोपही इतर आमदारांनी केला.

हेही वाचा..

Related Stories

No stories found.