आमदार आशुतोष काळे, आमदार जाधव यांना साईबाबा पावले!

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांची निवड झाली. तर सदस्यपदी नाशिकचे माजी आमदार जयंत जाधव यांची निवड झाली आहे. त्यामुळे दिर्घकाळ रेंगाळलेल्या या नियुक्त्या झाल्याने आमदार काळे आणि जयंत जाधव यांना अखेर साईबाबा पावले.
Kale-Jadhav
Kale-Jadhav

नाशिक : साईबाबा संस्थानच्या (Shree Saibaba sansthan) अध्यक्षपदी कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांची निवड झाली. तर सदस्यपदी नाशिकचे माजी आमदार जयंत जाधव (Jayant Jadhav) यांची निवड झाली आहे. त्यामुळे दिर्घकाळ रेंगाळलेल्या या नियुक्त्या झाल्याने आमदार काळे आणि जयंत जाधव यांना अखेर साईबाबा पावले.

अध्यक्षपदाच्या नावाबाबत सकाळ यापूर्वी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. या पदास राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. गुरुवारी रात्री उशिरा एकूण सतरा पैकी अकरा विश्वस्तांच्या नावाची यादी राज्याच्या विधी व न्याय विभागाने जाहीर केली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अॅड. जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
नव्या मंडळातील अन्य सदस्यांची नावे पुढील प्रमाणे : माजी आमदार जयंतराव जाधव (नाशिक), अनुराधा आदिक (नगराध्यक्ष, श्रीरामपूर), अॅड. सुहास आहेर (संगमनेर), अविनाश दंडवते (साकुरी), सचिन गुजर (श्रीरामपूर), राहुल कनाल (मुंबई), सुरेश वाबळे (राहुरी), महेंद्र शेळके (शिर्डी), डॉ. एकनाथ गोंदकर (शिर्डी) व शिवाजी गोंदकर (नगराध्यक्ष शिर्डी, पदसिद्ध). 

नूतन अध्यक्ष आमदार काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या गुडबूक मधील आमदार म्हणून परिचित आहेत. पवार यांनी यापूर्वी त्यांच्याकडे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. पाठोपाठ त्यांच्याकडे देशातील एक प्रमुख देवस्थान असा लौकिक असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करून उसाला सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून नावारूपास आणण्याची कामगिरी त्यांनी करून दाखविली आहे.

आमदार काळे यांना नुकतेच पुत्ररत्न झाले त्यापाठोपाठ त्यांची साईसंस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाली. एक अर्थाने त्यांच्या दृष्टीने सप्टेंबर महिना भाग्याचा ठरला. तथापि अद्यापही सहा विश्वस्तांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. विश्वस्तपद निवडीचे निकष व पात्रतेचा पालन करण्यासाठी या नव्या यादीत काही फेरबदल करण्यात आले. सुरेश वाबळे व डॉ. एकनाथ गोंदकर यांना मंडळात दुस-यांदा संधी मिळाली. तर नगराध्यक्षासह एकूण तीन विश्वस्त शिर्डीतील आहेत. 

...
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी साईसंस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. भाविकांचे हित डोळ्या समोर ठेवून आपण ही जबाबदारी समर्थपणे पार पाडू. यापूर्वी अध्यक्षपदासाठी माझे नाव चर्चेत येताच कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गावोगाव फटाक्यांची आतषबाजी झाली होती. कार्यकर्त्यांनी त्यावेळी साजरी केलेली आनंदाची दिवाळी आज प्रत्यक्ष साकार झाली 
- आशुतोष काळे, आमदार, कोपरगाव 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com