राज्यपाल हे पोस्टमन नाहीत : गुणरत्न सदावर्ते - Governors are not postmen: Gunaratna Sadavarte | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपाल हे पोस्टमन नाहीत : गुणरत्न सदावर्ते

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली मते मांडली.

मुंबई ः राज्यपाल हे काही पोस्टमन नाहीत. राजभवन म्हणजे काही टपाल कार्यालय नाही, की इथे येऊन मेसेज पोहोचवावेत. मराठ्यांच्या दबावामुळे आता या भेटीगाठी सुरू आहेत. जिथे- जिथे आम्हाला लढाईची गरज आहे, तिथे आम्ही कायदेशीर लढाई लढू. आम्ही राज्यपालांच्या माध्यमातून केंद्राला सुद्धा आवाहन केलेलं आहे, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते (Sadavarte) यांनी दिली. (Governors are not postmen: Gunaratna Sadavarte)

मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली मते मांडली.

ते म्हणाले, की राज्यपालांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली आहे. मराठा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून भेट घेण्यास सांगितले आहे. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करावाच लागेल. शिष्टमंडळाकडून भेटी घेणं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर अशा पद्धतीने वागणं चुकीचे आहे. राज्यातील मराठा नेते हे असंविधानिक मार्गाने चाललेले आहेत.

हेही वाचा...

कोरोना कमी होतोय

सदावर्ते म्हणाले, की मराठ्यांना मागास ठरवण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यापूर्वी दोन्ही बाजुंचे युक्तिवाद ऐकून घ्यावेत. राज्यपालांनी सगळं काही ऐकून घेतलं आणि यावर विचार करू, अस आश्वासन दिले.

राजेशाही संपली आहे

याबाबत बोलताना खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले, की राजेशाही संपली आहे. आता ते काय बोलतात, ते त्यांच्यापुरत मर्यादित आहेत. ही बाब मराठ्यांच्या बाबतीत लागू होऊ शकत नाही, असे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.

 

हेही वाचा..

'कोरोना'ने दिली नातेसंबंधांना बळकटी

सिद्धटेक : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रितपणे घरी रहात आहेत. व्यस्त जीवनपद्धती जगणारी मुले,सुना,नातवंडे वृद्ध आजी-आजोबांसोबत एकत्रित खेळताना, बागडताना पुन्हा एकदा दिसत आहेत. अशा प्रकारे पूर्वी पाहायला मिळणारे हे चित्र ग्रामीण भागात एकत्रित कुटुंब पद्धतीची संस्कृती पुन्हा दृढ झाल्याचे व पर्यायाने नातेसंबंधांना बळकटी मिळाल्याचे निदर्शक आहे.

कोरोना विषाणूच्या दहशतीनंतर शासनाने लॉकडाऊन सुरू करून नागरिकांना घरातच बसून राहण्याचे आवाहन केले.मागील लॉकडाऊननंतर आताच्या संचारबंदीमध्ये शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बहुसंख्य नागरिकांनी कडक नियमावलीचे गांभीर्याने पालन केले.या नियमावलीचे पालन करावे लागल्यामुळे अनेक कुटुंबे घरामध्ये एकवटली. पुणे-मुंबई तसेच देशात व परदेशात ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌रहाणारे सदस्य घरी परतले.

सामुहिकरित्या स्वयंपाक करून सर्वजण एकत्र जेवताना पाहून एकमेकांचे संबंध अधिक दृढ झाले. जेवल्यानंतर एकत्र गप्पांचे फड रंगल्याचे पाहून इतरांचा जळफळाट देखील होऊ लागल्याने एकत्रित कुटुंबपद्धती खऱ्या अर्थाने दृढ झाली असल्याचे संकेत ठळक झाले आहेत.

सुनबाईंनी बनवलेल्या स्वयंपाकाची चव चाखत मुले, वडीलधारी मंडळी खऱ्या अर्थाने सुखावून गेली आहेत. शेतात एकत्र काम करणे, एकत्र जेवण, एकत्र गप्पा करण्याने कुटुंबातील एकोपा व जिव्हाळा पूर्वीपेक्षाही काकणभर वाढल्याची जाणीव परस्परांना होत आहे. त्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे गावासोबत तुटत चाललेली नाळ पुन्हा एकदा जुळू लागली आहे.एरवी केवळ यात्रा-जत्रांसाठी येणारे सगे-सोयरे,कुटुंबीय,आप्तेष्ट आता कोरोना संसर्गाच्या भीतीने गावांमध्ये एकत्र जमू लागले आहेत.

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख