श्रीरामपुरच्या सराफाकडून मुंबईच्या व्यापाऱ्याची दोन कोटींची फसवणूक

डहाळे याने मेहता यांच्याबरोबर सोने व हिऱ्याचे दागिने खरेदीचा व्यवहार केला होता. त्यानंतर मेहता यांनी सोनेखरेदीची रक्कम डहाळे याच्याकडे मागितली.
Crime.jpg
Crime.jpg

श्रीरामपूर : मुंबई येथील सोने व हिऱ्यांच्या व्यापाऱ्याची येथील सुवर्ण व्यावसायिकाने सुमारे एक कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दिवेश प्रकाश मेहता (रा. विलेपार्ले, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात वैष्णवी अलंकार गृहाचे बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाळे याने मेहता यांच्याबरोबर सोने व हिऱ्याचे दागिने खरेदीचा व्यवहार केला होता. त्यानंतर मेहता यांनी सोनेखरेदीची रक्कम डहाळे याच्याकडे मागितली. मात्र, डहाळे याने रक्कम व दागिने देण्यास टाळाटाळ केली. तसेच, ‘काय करायचे ते कर; तुझे सोन्याचे व हिऱ्याचे दागिणे आता मिळणार नाहीत. पैसेदेखील मिळणार नाहीत,’ असे सांगितले. त्यानंतर मेहता यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, ‘सोन्याचे दागिने ठेवा व प्रत्येक महिन्याला प्रतितोळा एक हजार रुपये मिळवा,’ या योजनेद्वारे बाळासाहेब डहाळे, अक्षय डहाळे यांनी कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील एका महिलेसह शहरातील आठ जणांची ६४ लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी योगिता पवार (रा. कोकमठाण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब डहाळे, अक्षय डहाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

ज्वेल-गोल्डी योजनेद्वारे फसवणूक

बाळासाहेब व अक्षय डहाळे यांनी ज्वेल-गोल्डी योजना सुरू करून, सोने जमा करून तोळ्यामागे प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. या योजनेतून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासातून पुढे आले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com