डेल्टा प्लसचा राज्यात पहिला बळी, ८० वर्षांच्या महिलेचा मृत्यू - Delta Plus first victim in the state, 80-year-old woman dies | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

डेल्टा प्लसचा राज्यात पहिला बळी, ८० वर्षांच्या महिलेचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 जून 2021

एप्रिलमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण ७५०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २१ लोकांमध्ये डेल्टा प्लस प्रकारच्या विषाणूचा संसर्ग आढळला.

मुंबई : मध्य प्रदेशनंतर कोरोना (Corona) विषाणूच्या नवीन डेल्टा प्लस प्रकाराने महाराष्ट्रातही पहिला बळी घेतला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८० वर्षीय महिला डेल्टा प्लस व्हेरिएंटला बळी पडली. उपचारादरम्यान रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्य विभागासह राज्य सरकार सतर्क झाले असून आता संपर्क ट्रेसिंग, चाचणी सुरू झाली आहे. (Delta Plus first victim in the state, 80-year-old woman dies)

 

रत्नागिरीचे सिव्हिल सर्जन डॉ. संघमित्रा गावडे यांनी सांगितले की, ३१ मे रोजी महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. या महिलेला असलेला मानसिक विकार, तसेच इतर आजार व वय लक्षात घेऊन सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या महिलेवर उपचार चालू होते; पण १३ जून रोजी तिचा मृत्यू झाला. या महिलेला प्रवासाचाही इतिहास नव्हता. सध्या या महिलेचा मुलगाही कोरोनाने त्रस्त असून उपचार सुरू आहेत.

एप्रिलमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण ७५०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २१ लोकांमध्ये डेल्टा प्लस प्रकारच्या विषाणूचा संसर्ग आढळला. शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे झालेल्या एका ८० वर्षीय व्यक्तीचा रत्नागिरीमध्ये मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे. या प्रकारातील सर्वाधिक सात घटना रत्नागिरीमध्ये आढळून आल्या आहेत. ज्या जिल्ह्यांत डेल्टा प्लसची प्रकरणे आढळली आहेत, त्यांच्या प्रवास-इतिहासाचा मागोवा घेण्यात आला आहे आणि त्यांची चाचपणी केली जात आहे. त्यांचे जवळचे संपर्क त्या रुग्णांकडून घेतले जातील आणि त्यांनी लस घेतली आहे की नाही, ही माहिती घेतली जाईल.

हा प्राणघातक आहे

डेल्टा प्लस प्रकार किती धोकादायक असू शकतो, तो किती वेगाने पसरतो, हा प्रकार प्राणघातक आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यास वेळ लागेल. जितके अधिक जीनोम सिक्वेंसिंग केले जातील तेवढे लवकर कळेल की, व्हायरसची व्याप्ती लोकांमध्ये किती प्रमाणात पसरत आहे. आता विषाणूच्या रूपांबाबत संशोधन केल्यास वरील प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.
- डॉ. ओम श्रीवास्तव, सदस्य, कोव्हिड टास्क फोर्स
 

हेही वाचा..

कोरोना रुग्णांची संख्या घटेना

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख