विधानभवनाच्या पायरीवर विरोधकांनी स्पिकर लावल्यावरून अधिवेशनात गोंधळ - Confusion in the convention as protesters put up speakers on the steps of the Vidhan Bhavan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

विधानभवनाच्या पायरीवर विरोधकांनी स्पिकर लावल्यावरून अधिवेशनात गोंधळ

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जुलै 2021

स्पिकर अनधिकृत लावल्याबाबत आमदार भास्कर जाधव म्हणाले, की संसद कामकाजाव्यतिरिक्त आपल्या परवानगीशिवाय कुठलंही कामकाज करता येत नाही. पत्रकारांना सुद्धा येता येत नाही.

मुंबई ः विधानभवनाच्या पायरीवर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला. स्पिकर लावून भाषणे सुरू केली. त्यावर अधिवेशनात चर्चा झाली. स्पिकरला कोणतीही परवानगी दिली नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केल्यानंतर संबंधितांवर कारवाई व्हावी, स्पिकर जप्त व्हावेत, अशी मागणी काही आमदारांनी केली. या वरून इतर सदस्यांनी गोंधळ घातला. (Confusion in the convention as protesters put up speakers on the steps of the Vidhan Bhavan)

स्पिकर अनधिकृत लावल्याबाबत आमदार भास्कर जाधव म्हणाले, की संसद कामकाजाव्यतिरिक्त आपल्या परवानगीशिवाय कुठलंही कामकाज करता येत नाही. पत्रकारांना सुद्धा येता येत नाही. कोणालाही परवानगी दिली नाही. अशा वेळी पायऱ्यांवर काही सभासद बसले आहेत. त्यांचा तो अधिकार आहे. परंतु या सभागृहात शासकीय कामकाजाव्यकिरिक्त कोणतेही कागदपत्र वितरीत करता येत नाही. मात्र काही खासगी पत्रके वितरित केले जात आहे. मी विचारले, कुणाची परवाणगी आहे, तर ते लोक पळून जाऊ लागले. त्या वेळी मी रक्षकांना बोलावले. येथे नियमांची पायमल्ली होते, हे लक्षात घेतले पाहिजे. कुठेतरी नियमांची पायमल्ली होता कामा नये. विधानसभा परिसरात कोणी स्पिकरला परवानगी दिली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावर विधानसभा अध्यक्षांनी सांगितले, की अशा पद्धतीची कोणीही परवाणगी मागितली नाही, किंवा तशी परवानगी देण्यात आलेली नाही. या वक्तव्यावर इतर आमदारही चिडले. परवानगी नसेल, तर संबंधित स्पिकर जप्त करायला हवे. नाही तर सिक्युरिटी प्रमुखावर कारवाई करा, अशी मागणी इतर आमदारांनी केली.

सुरक्षा विभागाने हा माईक व स्पिकर तातडीने जप्त करावा, अशी मागणी इतर आमदारांनी केली. 

पायऱ्यावर सभागृह चालू असले, तर आपले सभागृह थांबू. संपूर्ण मेडिया तेथे थांबला आहे. हे काय चालले आहे. तातडीने माईक ताब्यात घ्या व हे बंद करा, अशी मागणी आमदारांनी केली.

 

हेही वाचा..

मी राजकारणातून बाजूला गेलो नाही

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख