महाराष्ट्रात विविध विभागातील 15511 पदांची भरतीस मान्यता, अजितदादांची घोषणा - Approval for recruitment of 15511 posts in various departments in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

महाराष्ट्रात विविध विभागातील 15511 पदांची भरतीस मान्यता, अजितदादांची घोषणा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जुलै 2021

गेल्या अनेक वर्षांपासून सरकारच्या सर्वच विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासकीय कामांत अडथळे येत आहेत. तसेच बरोजगारी वाढली आहे.

मुंबई : राज्यातील विविध विभागातील 15 हजार 511 पदांची भरती करण्यास मान्यता मिळाली असून, लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सांगितली. (Approval for recruitment of 15511 posts in various departments in Maharashtra)

गेल्या अनेक वर्षांपासून सरकारच्या सर्वच विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासकीय कामांत अडथळे येत आहेत. तसेच बरोजगारी वाढली आहे. याबाबत एका विद्यार्थ्याने काल आत्महत्या केल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चिला गेला. स्पर्धा परीक्षा देण्यारे विद्यार्थी आत्महत्या करू लागले, याबाबत विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

सध्या अनेक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून कोणत्याच विभागात भरती नाही. त्यामुळे बेरोजगारांची फौजच तयार झाली आहे. याचे पडसाद आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावर पडले.

नव्याने 15 हजार 511 पदांची भरती करण्यात येणार असल्याने सरकारच्या विविध कार्यालयातील कामकाज सोपे होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

हेही वाचा..

कोण म्हणतं मी राजकारणातून बाजूला गेलो

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख