कोरोना प्रादुर्भाव ओसरल्यावर आंदोलन तीव्र करणार, मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्धार - The agitation will intensify after the outbreak of corona, the decision in the meeting of the Maratha Revolutionary Front | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना प्रादुर्भाव ओसरल्यावर आंदोलन तीव्र करणार, मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्धार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा तरुणांनी संयम सोडू नये; तसेच टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा तसेच विविध जिल्ह्यांतील सक्रिय मराठा संघटनांच्या बैठकीत करण्यात आले.

मुंबई : मराठा (Maratha) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा तरुणांनी संयम सोडू नये; तसेच टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा तसेच विविध जिल्ह्यांतील सक्रिय मराठा संघटनांच्या बैठकीत करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यावर आंदोलनाची धार तीव्र करण्याचेही ठरले. (The agitation will intensify after the outbreak of corona, the decision in the meeting of the Maratha Revolutionary Front)

मराठा क्रांती मोर्चा व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील मराठा सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दृकश्राव्य माध्यमातून गुरुवारी (ता.६) झाली. यात आरक्षणाचे अभ्यासक, वकील, समन्वयक, समाजात व्यापक संपर्क असलेले लोक आदी पाचशेहून जास्त जण उपस्थित होते.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यामुळे समाजातील सर्व स्तरांमध्ये असलेला आक्रोश बैठकीत मांडण्यात आला. सध्याच्या परिस्थितीला राज्यातील सर्वपक्षीय राजकारणी जबाबदार असल्याने त्या सर्वांचा निषेध नोंदविण्यात आला. तरुणांनी वा कोणीही टोकाचे पाऊल न उचलता संयमाची भूमिका घ्यावी, असेही बजावण्यात आले.

मराठा समाजावर झालेल्या अन्यायाला देशात आणि विदेशात वाचा फोडण्यासाठी समाजमाध्यमांमधून मराठ्यांचे प्रश्न बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहचविण्यात यावेत, यावरही भर देण्यात आला.

कायदेतज्ज्ञांसोबत स्वतंत्र बैठक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी मराठा समाजाचे निवृत्त न्यायाधीश, अभ्यासक, वकील तसेच जाणकार मंडळींची स्वतंत्र बैठक घेतली जाईल. त्यात पुढील कायदेशीर मार्ग तसेच वाटचालीची दिशा ठरवली जाईल, असेही सांगण्यात आले. काळ कठीण असला तरी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या नक्कीच मान्य करवून घेण्याचा निर्धार सर्वांनी केला, असे समन्वयक विरेन पवार यांनी कळविले आहे.

 

हेही वाचा..

आमदार कानडेंकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी 

श्रीरामपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आमदार लहू कानडे यांनी पढेगाव, टाकळीभान व देवळाली प्रवरा, टाकळीमियॉं व मांजरी (ता. राहुरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. 

याप्रसंगी संबंधित गावांचे सरपंच- उपसरपंच उपस्थित होते. आमदार कानडे म्हणाले, ""कोरोनाचे रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने संपूर्ण कुटुंब बाधित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळत आहे. सध्या गावपातळीवर शिक्षक, ग्रामसेवक, आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत केले जाणारे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. घरीच उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना व संशयित व्यक्तींना तत्काळ विलगीकरण कक्षात दाखल करावे.'' 

हेही वाचा...

कोपरगावात पोलिस बंदोबस्तात लसीकरण

""प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावेळी होणारी गर्दी कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत होऊ शकते. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणाऱ्या प्रत्येक उपकेंद्राला आठवड्यातील एक दिवस निश्‍चित करून द्यावा. त्या दिवशी केवळ त्या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातीलच व्यक्तींचे लसीकरण करावे. तसेच, सरकारच्या सूचनेनुसार नोंदणी केलेल्या नागरिकांना टोकन देऊन गर्दी टाळावी.'' प्राथमिक उपकेंद्र स्तरावर लसीकरण सुरू करण्याच्या सूचना आमदार कानडे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख