"अगस्ती'तील शुक्राचार्य कोण ओळखा अन्‌ त्यांना बाजूला करा, पवारांचे अकोलेकरांना आवाहन  - agasti shugar factory sharad pawar appeal akolekar | Politics Marathi News - Sarkarnama

"अगस्ती'तील शुक्राचार्य कोण ओळखा अन्‌ त्यांना बाजूला करा, पवारांचे अकोलेकरांना आवाहन 

शांताराम काळे 
रविवार, 24 जानेवारी 2021

माजी आमदार कै. यशवंतराव भांगरे पुतळ्याचे अनावरण श्री.पवार यांच्या हस्ते झाले

अकोले,ता .24 : अगस्ती सहकारी कारखाना 35 कोटीचा त्याच्यावर तीनशे कोटी कर्ज. मी वसंतदादा शुगरचा अध्यक्ष आहे, यातून मार्ग काढण्यासाठी अल्कोहोल निर्मिती, वीज निर्मिीती, सीएनजीची निर्मिती करून समस्या दूर करू परंतू झारीतील शुक्राचार्य कोण हे ओळखून त्यांना बाजूला करा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले. 

माजी आमदार कै. यशवंतराव भांगरे पुतळ्याचे अनावरण श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्ता तनपुरे,आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार गोटीराम पवार जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले आदी मान्यवर उपस्थित होते . 

लोणीला इयत्ता नववीत असताना सायकलवर जावून रंधा फॉल पाहिला होता, तेव्हापासून हा भाग माझ्या स्मरणात आहे. या भागासाठी काही तरी करणे आवश्‍यक आहे. जे लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांनी तालुक्‍याला सुविधा देताना तालुक्‍यातील जनतेला दुर्लक्षित करता काम नये असेही श्री. पवार म्हणाले. 

श्रीी. पवार म्हणाले, की पवनचक्की साठी स्थानिकांनी जमिनी दिल्या, त्या जमीन मालकांची मुले नोकरीला घेतली का ? त्यांना लाभ मिळाला का ? याचा अभ्यास करून माझ्याकडे या, आपण संबंधित मालकाला जाब विचारू. अकोले तालुक्‍यात विकास झाला नाही हे ऐकून मला खाली मान घालावी लागत आहे. अगस्ती 35 कोटींचा त्याच्यावर 300 कोटी कर्ज असल्याचे सांगण्यात आले. कारखान्याच्या समस्या दूर करू मात्र झारीतील शुक्राचार्य कोण हे ओळखून त्यांना बाजूला करा. 

अकोले तालुक्‍यातील रस्ते, पर्यटन विकासाबाबत तुम्हाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माझ्यासमक्ष आश्वासन दिले, त्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना अडचण आल्यास आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलू असेही श्री.पवार म्हणाले . 

महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारणातील जे महत्वाच्या व्यक्ती व घटक होते त्यापैकी कै. यशवंतराव भांगरे एक होते. त्याच्यासोबत काही काळ काम करता आले तालुका डाव्या चळवळीचा असतानाही भांगरे यांनी तालुक्‍यात पायाभूत सुविधा दिल्या. यापुढेही त्यानी सुरु केलेल्या कामास आमची साथ असेल. तालुक्‍यातील पर्यटन , रस्ते व अगस्तीचा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करू असे श्री. पवार यावेळी म्हणाले. 
................................... 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख