मुंबईत पावसाचा हाहाःकार, एनडीआरएफच्या पाच तुकड्या सज्ज - Water logging in Mumbai due to Very Heavy Rainfall | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत पावसाचा हाहाःकार, एनडीआरएफच्या पाच तुकड्या सज्ज

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

कालपासून सुरु झालेला पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे रेल्वेलाईनसह सर्वत्र पाणी साचले आहे. भेंडी बाजार, नाना चौक, मुंबई सेंट्रल, जेजे जंक्शन, हिंदमाता, काळा चौकी, वरळी सी फेस, माटुंगा अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. गेल्या चोवीस तासांत कुलाब्यात १३८ मिलिमीटर, पूर्व उपनगरात २० तासांत १९६ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरांत २० तासांत १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली

मुंबई : कालपासून मुंबई व परिसरात सुरु असलेल्या तुफानी पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला असून सर्व शासकीय व खासगी कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत १७३ मिलीमीटर पावासची नोंद झाल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्याची माहिती माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

कालपासून सुरु झालेला पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे रेल्वेलाईनसह सर्वत्र पाणी साचले आहे. भेंडी बाजार, नाना चौक, मुंबई सेंट्रल, जेजे जंक्शन, हिंदमाता, काळा चौकी, वरळी सी फेस, माटुंगा अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. गेल्या चोवीस तासांत कुलाब्यात १३८ मिलिमीटर, पूर्व उपनगरात २० तासांत १९६ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरांत २० तासांत १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सुटी जाहीर करण्यात आली असून आवश्यक त्या कामासाठीच घराबाहेर यावे, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्तांनी केले आहे. 

रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. काही गाड्या अगोदरच थांबवण्यात आल्या आहेत. मुंबई - भुवनेश्वर गाडी रात्री दहा वाजता सोडण्यात येणार आहे. भुवनेश्वर-मुंबई गाडी ठाण्यात थांबविण्यात आली तर हावडा -मुंबई गाडीही ठाण्याला थांबविण्यात आली. हैदराबाद - मुंबई आणि गदग- मुंबई या गाड्या कल्याणला थांबविण्यात आल्या.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अजूनही तुफान पाऊस सुरु आहे. प्रशासनाने सर्व खासगी व सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे. काल पासून मुंबई, ठाणे, पालघर यासह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पाणी तुडुंब भरत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरात राहावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्या असून आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख