महाराष्ट्रातून आजपासून धावणाऱ्या 26 विशेष ट्रेन रद्द?

लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना, नागरिकांना, त्यांच्या राज्यात पोहचण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे 100 विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी राज्यातून पहिल्याच दिवशी 26 ट्रेन धावणार होत्या. या ट्रेनचे वेळापत्रकही तयार करण्यात आले होते. तर प्रवाशांनी तिकीट बुकिंग सुद्धा केली होती. मात्र या रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला अद्याप राज्य सरकरने हिरवा झेंडा न दाखवल्याने या ट्रेन धावण्याची शक्‍यता मावळली आहे
Twenty Six Special Trains May be Cancelled
Twenty Six Special Trains May be Cancelled

मुंबई : आज (ता. 1)पासून देशभरात 100 स्पेशल ट्रेन सोडून सुमारे 200 फेऱ्या करणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले होते. सोमवारपासून महाराष्ट्रातून मध्य रेल्वेच्या 9 तर पश्‍चिम रेल्वेच्या 17 गाड्या धावणार होत्या, मात्र महाराष्ट्र सरकारकडून राज्यातून होणाऱ्या या प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वे मंत्रालयाला परवानगी न मिळाल्याने या 26 विशेष गाड्या रद्द होण्याची शक्‍यता आहे.

लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना, नागरिकांना, त्यांच्या राज्यात पोहचण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे 100 विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी राज्यातून पहिल्याच दिवशी 26 ट्रेन धावणार होत्या. या ट्रेनचे वेळापत्रकही तयार करण्यात आले होते. तर प्रवाशांनी तिकीट बुकिंग सुद्धा केली होती. मात्र या रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला अद्याप राज्य सरकरने हिरवा झेंडा न दाखवल्याने या ट्रेन धावण्याची शक्‍यता मावळली आहे.

रेल्वेची राज्य सरकारशी चर्चा सुरू

रेल्वे मंत्रालय अद्याप राज्य सरकारच्या आदेशाची वाट पाहत असून, स्पेशल ट्रेन सोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाची राज्य सरकारशी चर्चा सुरू असल्याचे सांगत पश्‍चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सोमवारी धावणाऱ्या ट्रेन धावणार नसल्याचे संकेत दिले आहे.

पश्‍चिम रेल्वे मार्गावरून सोमवारी सुटणाऱ्या ट्रेनची प्रेसनोट स्थगित करण्यात यावी, आंतरराज्य प्रवासी वाहतुकीवर सध्या बंदी असल्याने राज्य सरकारकडून अद्याप नवीन लॉकडाऊन अंतर्गत सूचना मिळालेल्या नाहीत. यासाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यानंतरच ट्रेनसंदर्भात निर्णय होईल.
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी पश्‍चिम रेल्वे

रेल्वे प्रवासाकरिता असे असतील नियम

केंद्र शासनाने 1 जुन रोजी रेल्वे सेवा मर्यादित प्रमाणात सुरू करण्याबाबत कारवाई सुरू केली आहे. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहतूक व्यवस्थेबाबत संदर्भातील आदेशान्वये राज्य शासनाने नियम जाहीर केले आहेत. या दरम्यान प्रवाशांना मास्क वापरणे, सॅनिटायजरचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य राहणार आहे.

असा करता येणार रेल्वे स्थानकांपर्यंतचा प्रवास

1. प्रवासी नागरिक खासगी वाहनांचा वापर करू शकतील, त्यासाठी त्यांना ईतिकीट दाखवावे लागेल व पाच आसनी वाहन 3 प्रवासी, सात आसनी वाहनास 5 प्रवासी (वाहन चालकासह) प्रवास करू शकतील
2. स्कुटर, दुचाकी, रिक्षाचा वापर करता येणार नाही
3. प्रवाशांना टॅक्‍सीचा वापर करता येईल

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर टॅक्‍सीसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई टॅक्‍सी मेन्स असोसिएशन यांच्या वतीने प्रमुख रेल्वे स्थानकावर प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहे. संबंधित प्रतिनिधींशी आगाऊ संपर्क करून टॅक्‍सी आरक्षित करावी, प्रवाशांनी शक्‍यतो व्हॉट्‌सअपवर मागणी नोंदवावी, म्हणजे संघटना प्रतिनिधी त्यांच्याशी स्वतःहून संपर्क करतील, असे परिवहन उपायुक्त पुरुषोत्तम निकम यांनी आवाहन केले आहे.

रेल्वे स्टेशन नुसार प्रतिनिधी

1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चंदू नायर : 9821640498
2. मुंबई सेंट्रल - चंदू नायर : 9821640498
3. लोकमान्य टिळक टर्मिनस - फरीद भाई : 7977774884, शशी दुबे : 9833080800, तुपे : 9082888380
4. वांद्रे टर्मिनस : देवडिया : 9029885938, कोटीयन : 7977927009
5. टॅक्‍सी संघटना प्रतिनिधी : श्‍याम खानविलकर : 8369545457, 8655551562

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com