वरुण सरदेसाईंवर झाले सरकार मेहेरबान - State Government Gave Security Cover to Varun Sardesai | Politics Marathi News - Sarkarnama

वरुण सरदेसाईंवर झाले सरकार मेहेरबान

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 जानेवारी 2021

काल राज्य शासनाने आदेश काढून भाजपच्या व अन्य पक्षांच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था घटवली तर काहींची काढून घेतली. राज्य शासनाने एकूण १३ जणांना नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला असून त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे.

मुंबई : राज्य शासनाने एकूण १३ जणांना नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला असून त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही नव्या वर्गवारीची सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे. 

महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा सरकार उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आढावा घेत असते. ठाकरे कुटुंबातील चार जणांना वाय सुरक्षा कवच कित्येक वर्षापासून देण्यात आले आहे.महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वाय दर्जाची सुरक्षा यंत्रणा झेड करण्यात आली होती.

काल राज्य शासनाने आदेश काढून भाजपच्या व अन्य पक्षांच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था घटवली तर काहींची काढून घेतली. सुरक्षा व्यवस्था घटवलेल्यात देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांचा समावेश आहे. अमृता फडणवीस आणि त्यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांचीही सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आली आहे. 

विशेष सरकारी वकिल अॅड. उज्ज्वल निकम यांना यापूर्वी वाय प्लस एस्काॅर्टसह, सुरक्षा व्यवस्था होती. ती झेड दर्जाची करण्यात आली आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांना असेलेल्या वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेचा दर्जा वाढवून तो झेड करण्यात आला आहे. 

अशी आहे सुरक्षा व्यवस्थेची वर्गवारी-
एक्स सुरक्षा व्यवस्थेत २ सुरक्षा रक्षक (कमांडो नव्हेत) असता. यातला एक व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी (पीएसओ) असतो. 

वाय सुरक्षा व्यवस्थेत ११ सुरक्षा रक्षक असतात. यापैकी एकजण कमांडो आणि दोन व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी (पीएसओ) असतात. व्हीआयपी लोकांना ही सुरक्षा दिली जाते.

झेड सुरक्षा व्यवस्थेत २२ सुरक्षा रक्षक असतात. राष्ट्रीय पातळीव एनएसजीचे चार किंवा पाच कमांडोही यात सहभागी असतात. यात व्हीआयपी व्यक्तीला एक एस्काॅर्ट कार दिली जाते. यातले कमांडो हे आधुनिक हत्यारांनी सज्ज असतात. शस्त्राशिवाय लढण्याचे प्रशिक्षणही त्यांना दिलेले असते. 

झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत ३६ सुरक्षा रक्षक असतात. त्यापैकी दहा कमांडो असता. त्यांच्याजवळ आधुनिक शस्त्रे असतात.

यांना मिळाली नवी वर्गवारी 
रामराजे निंबाळकर - वाय प्लस एस्काॅर्टसह
विजय वडेट्टीवार - वाय प्लस एस्काॅर्टसह (मुंबई शहरात)
वैभव नाईक - एक्स
संदीपान भुमारे - वाय
अब्दुल सत्तार - वाय
दिलीप वळसे पाटील - वाय
सुनील केदार - वाय
प्रवीण दरेकर - वाय
प्रकाश शेंडगे - वाय 
नरहरी झिरवाळ - वाय
सुनेत्रा पवार - एक्स
वरुण सरदेसाई - एक्स
राजेश क्षीरसागर - एक्स
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख