कोरोना रोखण्यासाठी मुंबईच्या लोकलमध्ये 'मार्शल्स'

पालिका आणि रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत नियमांचे उल्लघंन करणाऱ्या तब्बल २ हजार ५५८ नागरिकंवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत पालिका आणि रेल्वे प्रशासनाने ३ लाख २८ हजार ५०० इतका दंड नागरिकांकडून वसूल केला आहे.
Special Marshalls will be Appointed in Mumbai Locals
Special Marshalls will be Appointed in Mumbai Locals

मुंबई : मुंबईत सर्व सामान्यांनसाठी लोकल सेवा सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी पालिकेने आता लोकल प्रवास दरम्यान कोरोना मास्क न लावणाऱ्या तसेच कोरोना संदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त प्रवाशांवर कारवाईसाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

त्यामुळे कोरोना संदर्भातले नियम न पाळता प्रवास करणाऱ्यांना आता या विशेष मार्शलच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही मार्गावर ही कारवाई केली जाणार आहे. लोकल ही सर्व सामान्यांसाठी खुली केल्यानंतर मागील काही दिवसात स्थानकांवर गर्दी वाढू लागली.म्हणूनच की काय मागील काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं पहयला मिळते आहे. लोकलच्या प्रवासा दरम्यान अनेक नागरिक हे मास्क, तसेच इतर नियमांचे पालन करत नसल्याचंही निदर्शनास आल्यानंतर पालिका आणि रेल्वे प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. 

पालिका आणि रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत नियमांचे उल्लघंन करणाऱ्या तब्बल २ हजार ५५८ नागरिकंवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत पालिका आणि रेल्वे प्रशासनाने ३ लाख २८ हजार ५०० इतका दंड नागरिकांकडून वसूल केला आहे.

या पुढे रेल्वेतून प्रवास करताना तोंडाला मास्क किंवा इतर कोरोना संदर्भातील नियमचे पालन न केल्यास विशेष मार्कलकडून कारवाई केली जाणार आहे. तिन्ह मार्गावरच कारवाई केली जाणार असल्याने पालिका आणि रेल्वे प्रशासनाने उचललेल्या कठोर पाऊलामुळे लोकलमध्ये  कोरोना नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांना ताप बसू शकतो आणि रुग्ण वाढीच्या संख्येला ब्रेक लागू शकतो.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. परिस्थीती पुन्हा हाताबाहेर जाऊ नये याची खबरदारी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवावे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी लोक नियम पाळत नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com