महिलांना लोकल प्रवास नाकारण्यात भाजप नेत्यांचा हात - सचीन सावंत

मुंबई महानगर क्षेत्रातील माता भगिनींना लोकल प्रवासाची सुविधा द्यावी हा निर्णय राज्य सरकारने रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर मिळून घेतला होता. रेल्वे करत असलेली टाळाटाळ ही भाजपा नेत्यांच्या दबावाखाली आहे. भाजपाला गलिच्छ राजकारण करताना नवरात्रीची ही तमा नाही, असे म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते सचीन सावंत यांनी टीका केली आहे
Sachin Sawant Demands Entry of Women in Mumbai Local Trains
Sachin Sawant Demands Entry of Women in Mumbai Local Trains

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील माता भगिनींना लोकल प्रवासाची सुविधा द्यावी हा निर्णय राज्य सरकारने रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर मिळून घेतला होता. रेल्वे करत असलेली टाळाटाळ ही भाजपा नेत्यांच्या दबावाखाली आहे. भाजपाला गलिच्छ राजकारण करताना नवरात्रीची ही तमा नाही, असे म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते सचीन सावंत यांनी टीका केली आहे.

मुंबई उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये महिला प्रवाशांना अद्याप प्रवेश देण्यात आलेला नाही. हा प्रवेश द्यावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यावरुन सावंत यांनी रेल्वे मंत्रालय व भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. अॅमेझाॅन व फ्लिपकार्टमुळे फटका बसलेल्या छोट्या दुकानगारांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईतल्या महिलांना प्रवासासाठी शेअर टॅक्सी वापरावी लागत आहे. हे सुरक्षेसाठी चांगले असले तरी भाजपला नवरात्रीचीही काळजी नाही,'' असे सावंत यांनी म्हटले आहे. 

सचीन सावंत यांनी या आधी केलेल्या ट्वीटला पश्चिम रेल्वेने उत्तर दिले होते. राज्य सरकारबरोबर कार्यपद्धती निश्चित करण्याचे काम सुरु असल्याचे रेल्वेने कळवले होते. त्यावर ''राज्य सरकारने अगोदरच रेल्वे मंत्रालयाला याबाबत कळवले आहे. महिलांना लोकल गाड्यांत प्रवेश करण्याबाबत रेल्वे मंत्रालय चालढकल करते आहे हे आम्हाला समजते आहे. महिलांना प्रवेश देण्याबाबत नवी कार्यपद्धतीच आणायची होती तर आधी रेल्वे बोर्डाची परवानगी घेण्याचे नाटक का केले,'' असा सवाल सावंत यांनी ट्वीटद्वारे उपस्थित केला आहे.

''महिलांना लोकल गाड्यांत प्रवेश देण्याचा मुद्दा रेल्वे मंत्रालय काही कारण नसताना गुंतागुंतीचा करत आहे. सध्या सुरु असलेल्या रेल्वे प्रवासासाठी कार्यपद्धती अगोदरच निश्चित आहे. त्यात बदल करण्याची आवश्यकता नाही,'' असेही सावंत यांनी म्हटले आहे.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com