Offence Registered against BJP MLA Ramesh Karad
Offence Registered against BJP MLA Ramesh Karad

सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन; भाजपचे आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल 

आमदार रमेश कराड यांनी गुरुवारी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा संचार बंदीचा आदेश झुगारून समर्थकांसह जमाव जमवून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड ः परळी तालुक्‍यातील गोपीनाथ गड येथे जाऊन भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य (आमदार) रमेश कराड यांनी गुरुवारी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा संचार बंदीचा आदेश झुगारून समर्थकांसह जमाव जमवून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आमदार रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलिस प्रशासनास कसलीही पूर्व कल्पना न देता अचानक दर्शनास येऊन लोक जमा केले. या वेळी त्यांच्या समवेत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड यांच्यासह सुमारे 20 ते 22 जण होते. 

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याची माहिती असूनही आमदार कराड व त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे आणि प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परळी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com