..तर सुनावणी ऑनलाईनच!; उच्च न्यायालयाचा इशारा - Mumbai High Court Judge Warns to take Online Hearing | Politics Marathi News - Sarkarnama

..तर सुनावणी ऑनलाईनच!; उच्च न्यायालयाचा इशारा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

राज्यभरात कोरोना संसर्गात वाढ होत असताना मुंबई उच्च न्यायालयानेदेखील याची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालय परिसरात उपस्थित पक्षकार, वकील तसेच सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे चोख पालन केले नाही, तर पूर्णवेळ ऑनलाईन सुनावणी सुरू करण्यात येईल, असा इशारा न्यायमूर्तींनी दिला आहे.

मुंबई  : राज्यभरात कोरोना संसर्गात वाढ होत असताना मुंबई उच्च न्यायालयानेदेखील याची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालय परिसरात उपस्थित पक्षकार, वकील तसेच सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे चोख पालन केले नाही, तर पूर्णवेळ ऑनलाईन सुनावणी सुरू करण्यात येईल, असा इशारा न्यायमूर्तींनी दिला आहे.

न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी बुधवारी (ता. १७) जारी केलेले सूचनापत्र उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. कोविडबाबत सरकारने जारी केलेल्या सुरक्षा तत्त्वांचे पालन होत नसल्याबद्दल न्यायमूर्ती पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्व उपस्थित पक्षकारांनी या सुरक्षा तत्त्वांचे काटेकोर पालन करायला हवे, न्यायालयात ज्यांची सुनावणी असेल त्यांनीच प्रवेश करावा आणि सर्व नियम पाळावेत, असे आदेश सूचनापत्रात दिले आहेत. या सुरक्षातत्त्वांचे पालन होताना दिसत नसेल तर तात्काळ प्रत्यक्ष सुनावणी बंद करून ऑनलाईन सुनावणी पूर्ण वेळ सुरू करण्यात येईल, असा इशारा न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी दिला आहे.

नियमावली जाहीर
गेल्या वर्षी एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत पूर्णवेळ ऑनलाईन सुनावणी सुरू होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात आले. यासाठी नियमावली जाहीर केली असून मास्क वापरणे बंधनकारक आहे. सध्या शुक्रवारीच ऑनलाईन सुनावणी होत असते. तसेच पक्षकारांनी विनंती केल्यास ऑनलाईनचा पर्याय दिला जातो.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख