२४ तासांत 115 पोलिसांना कोरोना; राज्यात ३४२ बाधित; अनेक वसाहती सील - More Than Hundred Police Personnel Tested Positive for Corona in Last Twenty Four Hours | Politics Marathi News - Sarkarnama

२४ तासांत 115 पोलिसांना कोरोना; राज्यात ३४२ बाधित; अनेक वसाहती सील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 मे 2020

राज्यातील ५१ पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे; तर तीन कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. ४९ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. सध्या या विभागातील १४३ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

मुंबई : कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पोलिस योद्‌ध्यांना संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत असून राज्यात २४ तासांत तब्बल ११५ पोलिसांना या आजाराची लागण झाली आहे. राज्यात आता ३४२ पोलिस कोरोनाबाधित आहेत. एकट्या मुंबईत १४३ पोलिसांना लागण झाली आहे.

राज्यातील ५१ पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे; तर तीन कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. ४९ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. सध्या या विभागातील १४३ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. वडाळा पोलिस ठाण्यातील नऊ पोलिसांचा एकाच दिवसांत पॉझिटिव्ह अहवाला आला होता. त्यापूर्वी जुहू, वाकोला पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. 

रफी किडवाई मार्ग वसाहतीतील एका सहाय्यक निरीक्षकाला बाधा झाली आहे. दुसरीकडे भायखळा येथे देखील एका पोलिसासा बाधा झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत रुग्ण सापडलेल्या पोलिस वसाहतीतील काही इमारतीही सील करण्यात आल्या होत्या. या विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ तासांत ११५ पोलिसांना लागण झाली असून राज्यात ३४२  जणांवर उपचार करण्यात आले.

हल्लाप्रकरणी ६५७ जणांवर गुन्हा दाखल

राज्यभरात पोलिसांवर हल्ला झाल्याची १७१ प्रकरणे घडली असून त्यात ६५७ नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावमध्ये नुकताच काही नागरिकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. मुंबईतील गोवंडी येथेही पोलिसांवर हल्ल्याच्या दोन घटना घडल्या होत्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख