MIDC चा सर्व्हर हॅक, कामकाज ठप्प! हॅकर्सकडून ५०० कोटींची मागणी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसीचा सर्व्हर हॅक करणाऱ्या हॅकर्सकडून तब्बल पाचशे कोटींची मागणी करण्यात आली आहे.
cyber Crime
cyber Crime

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसीचा सर्व्हर  हॅक करणाऱ्या हॅकर्सकडून तब्बल पाचशे कोटींची मागणी करण्यात आली आहे. या हॅकर्सने एमआयडीसीच्या अधिकृत मेल आयडीवर 500 कोटींच्या मागणीचा मेल केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. MIDC Server Hacked by Hackers Demanded Five Hundred Crore

महाराष्ट्र (Maharashtra) औद्योगिक विकास महामंडळाचा (MIDC) सर्व्हर हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. हॅकर्सनी यासंदर्भात पाचशे कोटी रूपयांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. मागणी पूर्ण केली नाही तर डेटा (DATA) हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील सर्व महत्वाचा डेटा नष्ट करण्याची धमकीही हॅकर्सची दिल्याचे प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. डेटा रिस्टोर करून यासंदर्भात सायबर सेलकडे (Cyber Cell) तक्रार करावी अस मत सायबर तज्ञांनी व्यक्त केले आहे.

हॅकर्स देशातील आहेत की परदेशातील आहेत या संदर्भात अजूनही माहिती उपलब्ध झाली नसली तरी त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.मात्र एमआयडीसीच्या डेटा हॅक झाल्याचे  समोर येताच एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयात चौकशी सुरू करण्यात आली असून सर्व्हरची सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून होत आहे. 

दरम्यान याआधीही गतवर्षी मुंबई आणि परिसरातील वीज (Electricity) गायब होण्यामागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला होता मात्र, एमआयडीसीचा डेटा हॅक झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडालीय. मागील सोमवारपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाल्याने राज्यातील मुंबईतील मुख्य कार्यालयासह सोळा प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com