मुूंबईत झाली बत्ती गुल; व्यवहार झाले ठप्प - Major Grid Failure in Mumbai No Electricity in Major Part | Politics Marathi News - Sarkarnama

मुूंबईत झाली बत्ती गुल; व्यवहार झाले ठप्प

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला ग्रीड फेल्युअरचा फटका बसला असून  मुंबईत सकाळपासून वीज गेली आहे. रेल्वे सेवा, रुग्णालये यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुपारचे तीन वाजतील, असा अंदाज आ

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला ग्रीड फेल्युअरचा फटका बसला असून  मुंबईत सकाळपासून वीज गेली आहे. रेल्वे सेवा, रुग्णालये यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुपारचे तीन वाजतील, असा अंदाज आहे. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, अलिबागलाही याचा मोठा फटका बसला आहे. 

सकाळी दहा वाजून पन्नास  मिनिटांनी टाटा पाॅवर कंपनीकडून पुरवल्या जाणाऱ्या वीजेचे ग्रीड बंद पडले. त्यामुळे अर्ध्या मुंबईचे दिवे गेले. महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने  मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे, असे सांगण्यात आले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे चर्चगेट ते बोरिवली दरम्यानची उपनगरी सेवा बंद झाली आहे. 

संबंधित लेख