नारायण राणेंच्या 'आधिश' बंगल्याचा आज तहसीलदारांकडून पंचनामा

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जुहू येथे बांधलेल्या सात मजली 'आधिश' या बंगल्याची पाहणी आज अंधेरी तहसील कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथाॅरिटीकडे तक्रार केली होती
Inspection of Narayan Rane Bungalow Today
Inspection of Narayan Rane Bungalow Today

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जुहू येथे बांधलेल्या सात मजली 'आधिश' या बंगल्याची पाहणी आज अंधेरी तहसील कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथाॅरिटीकडे (MCZMA)तक्रार केली होती. (Inspection of Narayan Rane Bungalow in Mumbai Juhu Today)

राणे (Nararay Rane) यांनी जुहू येथे सी.आर.झेड.2 चे उल्लंघन करुन हा अनधिकृत बंगला बांधल्याची तक्रार भालेकर यांनी केली होती. त्यानंतर 'एमसीझेडए' ने "मुंबई उपनगर  जिल्हाधिकारी" आणि "महानगरपालिका आयुक्त" यांना नोटीस बजावली" होती. राणे यांनी बांधलेला हा बंगला जुहू (Mumbai) चौपाटीपासून केवळ ५० मीटर अंतरावर असून त्याने समुद्री हद्दीचा भंग होत असल्याची तक्रार भालेकर यांनी केली होती. 

आता संबंधितांच्या उपस्थितीत या बंगल्याचा आज दुपारी पंचनामा करण्यात येणार आहे. यापूर्वी भालेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात नारायण राणे, त्यांच्या पत्नी निलम राणे आणि नितेश व निलेश राणे या दोन पूत्रांविरोधात याचिका दाखल केली होती. भ्रष्टाचार (Corruption) व मनी लाँडरिंगचे आरोप त्यात करण्यात आले होते. राणे कुटुंबाकडे बेनामी संपत्ती असल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता. राणे कुटुंबाने काही सरकारी जमिनीही हडपल्याची भालेकर यांची तक्रार होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यांची याचिका प्रतिनिधीत्व या सदरात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले होते. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com