विदेशात अडकलेल्यांच्या ‘घरवापसी’साठी प्रयत्न, आदित्य ठाकरेंना आश्‍वासन 

अमेरिका, युरोप व ऑस्ट्रेलियातील भारतीयांना आणण्यासाठी आणखी विमाने पाठविण्याची योजना आहे,’’ अशी माहिती त्यांनी ट्विटवरुन दिले आहे.
विदेशात अडकलेल्यांच्या ‘घरवापसी’साठी प्रयत्न, आदित्य ठाकरेंना आश्‍वासन 

नवी दिल्ली : ‘‘लॉकडाउनमुळे अन्य देशांत अडकलेल्या भारतीयांना घेऊन अनेक विमाने परतली आहेत. अजून काही विमाने पाठविण्याचा विचार करीत आहे,’’ असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी सांगितले 

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विदेशात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना परत आणण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाला नुकतेच केले होते. त्याची दखल जयशंकर यांनी घेतली. कोरोनामुळे विदेशात अडकलेल्या राज्यातील लोकांना परत आणण्यासाठी जी व्यवस्था केली आहे,

त्यात महाराष्ट्राने केलेली मदत कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. ‘‘ब्रिटन, अमेरिका, मलेशिया, सिंगापूर, बांगलादेश, फिलिपाइन्स, कुवेत, अफगाणिस्तान, इथिओपिया आणि ओमानमधील भारतीयांना घेऊन विमाने परतली आहेत.

भुवनेश्वर बनले कोरोना मुक्त शहर 
ओडिशाची राजधानी असलेले भुवनेश्वर शहर हे कोरोना मुक्त शहर बनले असल्याची माहिती येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. 

भुवनेश्वरमध्ये आत्तापर्यंत ५० कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ओडिशामध्ये सोमवारी ४८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ८७६ वर पोहोचला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने सोमवारी दिली. दरम्यान सोमवारी नव्याने सापडलेल्या ४८ रुग्णांपैकी ४७ जण हे स्थलांतरित कामगार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

ओडिशातील कंधमल जिल्ह्यात सोमवारी पहिला रुग्ण सापडला असून यामुळे राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले .

सध्या राज्यात ६५२ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून राज्यात एकूण ८७६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, २२० रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com