Bogus Employment Racket Busted in BMC | Sarkarnama

भरतीच्या नावाने मुंबई पालिकेची फसवणूक; पाच जणांवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 जुलै 2020

ऑगस्ट २०१७ ते ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत मुंबई महापालिकेच बोगस भरतीचा प्रकार घडला असून बोगस नियुक्तीपत्राच्या सहाय्याने चार कर्मचा-यांना हजर करण्यात आल्यामुळे त्यांची बायोमेट्रीक हजेरी होत नव्हती. त्यामुळे त्यांना पगार मिळाला नाही, त्यावेळी झालेल्या पडताळणीत हा संपूर्ण प्रकार उघड झाला.

मुंबई : बोगस नियुक्ती आदेशाच्या सहाय्याने चार कर्मचा-यांची अनुकंपा तत्त्वावर भरती करून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणां विरोधात माहिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये दलाल व पालिका कर्मचा-यांचा सहभाग असल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

ऑगस्ट २०१७ ते ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला असून बोगस नियुक्तीपत्राच्या सहाय्याने चार कर्मचा-यांना हजर करण्यात आल्यामुळे त्यांची बायोमेट्रीक हजेरी होत नव्हती. त्यामुळे त्यांना पगार मिळाला नाही, त्यावेळी झालेल्या पडताळणीत हा संपूर्ण प्रकार उघड झाला.

जी उत्तर विभागातील सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक प्रकाश साबळे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी माहिती पोलिसांनी भादंवि कलम कट रचणे, तोतयागिरी, फसवणूक, बनावटीकरण आदी कलमांअंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल कण्यात आले आहे. याप्रकरणातील तक्रारीनुसार, महापालिकेतून कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याच्या कुटुंबिबियांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रशासकीय अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन ते प्रकरण ग्रॅंड रोड येथील प्रमुख अभियंता घनकचरा यांच्या कार्यालयात येते. तेथे याप्रकरणांची पुढील पडताळणी केली जाते. 

पुढे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर संबंधीत कर्मचा-याला नियुक्तीच्या ठिकाणी पाठवण्यात येते. जी उत्तर विभागात मध्ये चार सफाई कर्मचारी बनावट नियुक्ती पत्राच्या सहाय्याने हजर झाले होते. पुढे त्यांचा पगार काढतावेळी झालेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाला. त्यानंतर याप्रकरणी माहिम पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. तसेच याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. 

त्या विभागीय चौकशीत ग्रॅंट रोड घन कचरा व्यवस्थापन विभागातील काही कर्मचा-यांचा याप्रकरणी सहभाग आढळला. त्यानंतर त्यांच्याबाबतही पोलिसांकडे याप्रकरणी रितसर तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार नीता सुर्वे, किसन बांडे, तानाजी घाग, हर्षल शेळके व दलाल मुरगन कुक्कुस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख