आता मुंबईत हा नवा धारावी पॅटर्न - प्लाझ्मा दानाचा!

पालिकेच्या काही रुग्णालयांत प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली. त्यानंतर गंभीर रुग्णांवर या थेरपीचा वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे येण्याचे आवाहन पालिकेसह राज्य सरकारने वारंवार केले आहे. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरे घेऊन प्लाझ्मा उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागला आहे.
BMC to Organize Plazma Donation Camp in Dharavi
BMC to Organize Plazma Donation Camp in Dharavi

मुंबई  : ''सरकारी यंत्रणांच्या रडारवर कोरोनाच्या मोठ्या संख्येमुळे काही दिवसांपूर्वी असणारी धारावी आता प्लाझ्मा दानासाठीदेखील पुढे येणार आहे. धारावीतील कोरोनातून मुक्त झालेल्या काही रुग्णांची पुढील पाच दिवसांत विशेष आरोग्य शिबिरात तपासणी केली जाणार असून त्यातील प्लाझ्मा दान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम व्यक्तींकडून प्लाझ्मा घेण्यात येणार आहे,'' अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे. या उपक्रमामुळे हे शिबीर देशात एक वेगळा उपक्रम ठरेल, असा विश्‍वासही चहल यांनी व्यक्त केला. 

मुंबईत कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढवण्यावरही भर देणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. धारावीत कोरोनामुळे आतापर्यंत २४९२ जण बाधित झाले आहेत. त्यातील २०९५ रुग्ण उपचार घेऊन बरेही झाले आहेत. सध्या १४७ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या काही रुग्णांची आरोग्य शिबिरात पुढीत पाच दिवसांत तपासणी केली जाईल. या शिबिराच्या माध्यमातून प्लाझ्मा दानासाठी सक्षम रुग्ण निवडण्यात येणार आहेत. त्यांना प्लाझ्मा दानासाठी तयार करण्यात येणार आहे. त्यातून जे प्लाझ्मा उपलब्ध होतील ते पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येतील.

प्लाझ्मा दात्यांची वानवा
पालिकेच्या काही रुग्णालयांत प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली. त्यानंतर गंभीर रुग्णांवर या थेरपीचा वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे येण्याचे आवाहन पालिकेसह राज्य सरकारने वारंवार केले आहे. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरे घेऊन प्लाझ्मा उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागला आहे. 

मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही कमी
मुंबईतील ८३१ प्रतिबंधित क्षेत्र गेल्या काही दिवसांत १५३ ने कमी करण्यात यश आले आहे. कोरोनाच्या लागणीमुळे सील कराव्या लागलेल्या  इमारतींची संख्या कमी करण्यावरही लक्ष केंद्रित करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. एमएमआरडीए आणि महापालिका एकत्र येऊन समन्वयाने रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी डॅश बोर्ड प्रणाली उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठी मदत मिळेल, अशी आशा इकबालसिंह चहल यांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com