मुंबई विद्यापीठात 'सामंतशाही'!.....'या' नेत्याने केला आरोप

राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर घाला घालण्यात येत असून उच्चशिक्षण मंत्र्यांकडून विद्यापीठात 'सामंतशाही' सुरू आहे. नॅक मूल्यांकन होणार असतानाच सरकारने मनमानी पद्धतीने कुलसचिवांची नियुक्ती केली असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे
Uday Samant - Ashish Shelar
Uday Samant - Ashish Shelar

मुंबई  : राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर घाला घालण्यात येत असून उच्चशिक्षण मंत्र्यांकडून विद्यापीठात 'सामंतशाही' सुरू आहे. नॅक मूल्यांकन होणार असतानाच सरकारने मनमानी पद्धतीने कुलसचिवांची नियुक्ती केली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या मूल्यांकनावर परिणाम हाईल की काय? इथेही सरकारचा अहंकारच दिसून येतो, अशी टीका भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केली आहे.

मुंबई विद्यापीठाची नॅक मूल्यांकनांची तयारी सुरू असतानाच राज्य सरकारने ८ जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठामध्ये नव्या कुलसचिवांची परस्पर नियुक्ती केली. विद्यापीठ कायद्याप्रमाणे कुलगुरूंनी प्रभारी कुलसचिव नेमला असतानाही आणि कुठलाही अनागोंदी कारभार नसताना राज्य सरकारने विद्यापीठात पुन्हा ढवळाढवळ केली. कुलगुरूंनी १४ जानेवारी रोजी राज्य सरकारला पत्र लिहून नॅक मूल्यांकन असल्याने आता कुलसचिव बदलल्यास त्याचा मूल्यांकनावर परिणाम होईल हे सांगितल्यावरही सरकारने विद्यापीठावर मनमानी करून कुलसचिव थोपवला. या बदलाचा नॅक मानांकनावर परिणाम झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सरकारी हस्तक्षेप नको असे म्हटले आहे; मात्र अहंकारी ठाकरे सरकारने मनमानी सुरू ठेवली आहे. हा विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला आहे, असा आरोप शेलार यांनी केला.

विद्यार्थीहितासाठी लढत राहणार!
राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांची स्वायत्तता धोक्‍यात आली आहे. उच्चशिक्षण मंत्र्यांनी पदभार स्वीकारताच विद्यापीठांकडे आर्थिक हिशेब मागितले होते. त्याला विरोध होताच सारवासारव करण्यात आली. त्यानंतर यूजीसी, विद्यापीठ, कुलपती, कुलगुरू, सिनेटला डावलून सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. न्यायालय आणि यूजीसीने फटकारल्यानंतर मात्र परीक्षा घ्याव्या लागल्या. ठाकरे सरकारने आता मर्जीतील कुलसचिवांची नियुक्ती करून विद्यापीठांवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे विद्यार्थीहिताच्या आड येणाऱ्या निर्णयाविरोधात आम्ही लढत राहू, असा इशाराही शेलार यांनी दिला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com