यशोमती ठाकूर म्हणाल्या, `तुमचा काही इंटरेस्ट दिसतोय!`

प्रश्नाच्या चर्चेत आमदार प्रशांत बंब मंत्र्यांना वारंवार प्रश्न विचारत होते. तेव्हा मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांना `तुम्ही व्यवस्थित अभ्यास करुन यावे, तुमचा काही तरी इंटरेस्ट दिसतोय` असे सुनावले. त्यामुळे आमदार व मंत्र्यांत चांगलीच खडाजंगी झाली.
Thakur-Bamb
Thakur-Bamb

नाशिक : कोरोनामुळे अंगणवाड्या बंद कराव्या लागल्या. त्यामुळे बालकांना घरपोच आहार देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट फेडरेशनला काम देण्यात आले. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार प्रशांत बंब मंत्र्यांना वारंवार प्रश्न विचारत होते. तेव्हा मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांना `तुम्ही व्यवस्थित अभ्यास करुन यावे, तुमचा काही तरी इंटरेस्ट दिसतोय` असे सुनावले. त्यामुळे आमदार व मंत्र्यांत चांगलीच खडाजंगी झाली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अंगणवाडी आहाराचे काम बचत गटांकडून काढल्याचा प्रश्न होता. त्याला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिले. तेव्हा मंत्र्याच्या  उत्तरामुळे समाधान न झालेले भारतीय जनता पक्षाचे सदस्य डॅा संजय कुटे हे आमदार बंब यांच्या मदतीला धाऊन आले. त्यांनी `इंटरेस्ट तुमचा आहे` असा आरोप केला. त्यावर यशोमती ठाकूर यांनी `त्यांचाच इंटरेस्ट असेल, याबाबतचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. ते उच्चस्तरीय समितीने निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात अंगणवाडी बंद झाल्यानंतर लाभार्थी बालके वंचीत राहू नयेत. त्यांना घऱपोच आहार मिळावा यासाठी निर्णय घेतला आहे.` असे सांगतिले. 

त्या म्हणाल्या, या आहारासाठी ज्या सुविधा लागतात, त्या अंगणवाडी महिलांकडे नसतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचा विचार करुन त्याबाबत उच्चस्तरीय समितीकडे हा विषय पाठविण्यात आला होता. त्यांनी त्याबाबत महाराष्ट्र स्टेट फेडरेशऩकडे हे काम सोपवले. त्यात कोरोना काळातही बालकांना आहार मिळावा हा चांगला हेतू आहे, 

यावेळी आमदार बंब यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या शिफारशीत अंगणवाडीच्या महिलांना त्यात सामावून घ्यावे. त्यांना त्यातच रोजगार द्यावा असे देखील म्हटले आहे. मग महाराष्ट्र स्टेट फेडरेशन ही संस्था कोणाची?. एक- दोन व्यक्तींना कामे देण्यासाठी हजारो बचत गटांवर अन्याय का करता? अशी विचारणा केली. 

त्यावर मंत्री ठाकूर यांनी, तुम्ही सांगता ती माहिती वेगळ्या विषयाची आहे. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करुन यावे, असे सांगितले. तरीही बंब अडथळे आनतच राहिले. त्यावर मंत्री ठाकूर यांनी कोविडची स्थिती संपली, की पुन्हा पुर्वीसारखेच काम सुरु होईल. बचत गटांना त्यांची कामे दिली जातील. मात्र तुम्ही वारंवार तेच विचारत आहात, तुमचा काही तरी इंटरेस्ट दिसतोय, असे सुनावले. त्यामुळे जळगावचे डॅा. संजय कुटे बंब यांच्या मदतीला धाऊन येत `त्यांचा नव्हे तुमचाच इंटरेस्ट आहे. कारण तुम्ही मंत्री झाल्यावर अजुन माझा खीसा गरम झालेला नाही,` असे म्हणाला होता. ते रेकॅार्डवर आहे, असे सांगतल्याने त्यांच्याl खडाजंगी झाली. यावरुन दोन्ही बाजुचे काही सदस्य बोलू लागल्याने गोंधळ झाला.
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com