चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे अवडंबर कशाला?

भाजप नेत्या चित्र वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे एव्हढे अवडंबर कशासाठी होते. चित्रा वाघ यांना याबाबत डगमगण्याचं कारण काय?. असे गुन्हे दाखल होत असतात.
Neelam Gorhe
Neelam Gorhe

 नाशिक : भाजप नेत्या चित्र वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे एव्हढे अवडंबर कशासाठी होते. (why so ostentation on Crime register against BJP leader Chitra Wagh) चित्रा वाघ यांना याबाबत डगमगण्याचं कारण काय?. (Chutra Wagh shall not panic on this issue) असे गुन्हे दाखल होत असतात, (Such cases happens) असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा निलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी केले. 

डॅा गोऱ्हे  या आज नाशिकच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी कोरोनाच्या प्रभावासह उपाययोजना आणि मदतकार्य यासंदर्भात बारीक सारीक तपशील त्यांनी विचारला.

यावेळी त्यांनी राजकीय प्रश्न विचारू नयेत असे स्पष्ट केले. मात्र भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विषयी प्रश्न विचारल्यावर त्या, म्हणाल्या, असे गुन्हे यापूर्वी देखील अनेकदा दाखल झाले आहेत. त्याची फारशी चर्चा होत नसते. वाघ यांच्याबाबत एव्हढे अवडंबर कशाला?. 

त्या म्हणाल्या, माझ्याबाबत देखील असे प्रसंग घडले आहेत. त्याला मी सामोरे गेले. त्यामुळे एवढं मोठं अवडंबर करण्याचं काम नाही. त्याचे  भांडवल करू नये. राजकारणामध्ये येताना भावनांचा विमा काढून यावे. त्या या प्रसंगाला सामोरे जाण्यास सक्षम आहेत. मात्र पत्रकार याविषयी का प्रश विचारतात, असा सवाल त्यांनी केला. 

शिवसेना नेते व राजीनामा दिलेले मंत्री संजय राठोड विचारणा करण्यात आली. त्यावर त्या म्हणाल्या, मला हा प्रश्न विचाराणे म्हणजे औचित्याचा भंग आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत चौकशी समिती नेमली आहे. आम्ही म्हणू तसा कायदा चालेल, असे कायद्यावर दबाव कोणीही टाकू नये.  आमच्याकडे खूप केसेस आहेत. महिला आयोगाच्या देखील आहेत. मात्र ज्या केसेसमध्ये त्याचे पुढे काहीच झाले नाही, त्या महिला कुठे? याचा शोध घेतला तर तो मोठा विषय आहे. 

त्या पुढे म्हणाल्या, राठोड प्रकरणात न्यायालय तपास करेल. मात्र सतत त्यावर बातम्या येतात. जी व्यक्ती प्रसिद्ध नाही, त्या प्रकरणाबाबत कोणी आवाज उठवत नाही. त्याकडेही लक्ष घातले पाहिजे. मी कोरोना आढावा बैठकीसाठी आले आहे. पत्रकारांनी इतर विषयांवर विचारलेले प्रश्न हे संवेदनहिनतेचे लक्षण आहे.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांसह विविध अधिकारी तसेच विभागांचे प्रमुख बैठकीस उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com