ऊर्मिला मातोंडकर यांचा उद्या शिवसेना पक्षप्रवेश

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर उद्या(ता. १) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या चार जागांपैकी एका जागेसाठी त्यांचे नाव सुचविण्यात आले आहे.
Urmila Matondkar
Urmila Matondkar

मुंबई : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर उद्या (ता. १) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या चार जागांपैकी एका जागेसाठी त्यांचे नाव सुचविण्यात आले आहे.

ऊर्मिला यांनी कॉंग्रेसमधून २०१९ मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी दिलेल्या लढतीचे कौतुक होत होते; मात्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच पाठिंबा मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. निवडणुकीनंतर त्या कॉंग्रेसपासून लांब होत्या. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेना आणि बॉलीवूडसोबत पंगा घेतला होता. त्यामुळे तिला थेट प्रत्युत्तर देणाऱ्या ऊर्मिला मातोंडकर एकमेव बॉलीवूड अभिनेत्री होत्या. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पक्षात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून ऊर्मिला यांचे नाव सुचवले. तसेच यापूर्वी ऊर्मिला आणि ठाकरे यांच्यात चर्चाही झाली होती. तेव्हापासून त्या शिवसेनेत प्रवेश कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस उद्या ऊर्मिला शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहे.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com