उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांकडून फोन गेल्याची चर्चा - Urmila Matondkar May Enter Shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांकडून फोन गेल्याची चर्चा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नेमणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर शिवसेनेत जाणार असून त्यांचे नांव शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त कोट्यासाठी पाठविले जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नेमणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर शिवसेनेत जाणार असून त्यांचे नांव शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त कोट्यासाठी पाठविले जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. गेल्या काही दिवसांपासून उर्मिला मातोंडकर सामाजिक विषयांवर खूप आक्रमक भूमीका मांडत आहेत. महाराष्ट्र, मुंबई यावरही त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत घेण्याचा विचार केला जाऊ शकतो. दरम्यान उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यासंदर्भात मी देखील चर्चा ऐकली आहे. हा निर्णय मंत्रीमंडळ घेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रीमंडळाने निर्णयाचे अधिकार दिले आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, मुख्यमंत्री विधानपरिषदेवरील  राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नांदेडचे धनगर नेते यशपाल भिंगे भाजपमधून नुकताच पक्ष प्रवेश केलेले एकनाथ खडसे, माजी खासदार राजू शेट्टी आणि गायक आनंद शिंदे यांची चार नावे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, पक्षाकडून याबाबत अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष चार चार नावांचा बंद लिफाफा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध लक्षात घेता ही नावे मान्य केली जातील काय याबाबत शंका आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख