सत्तरीच्या आजी झाल्या गावचा कारभार हाकण्यास सज्ज - Seventy year old women took charge as Village Sarpanch | Politics Marathi News - Sarkarnama

सत्तरीच्या आजी झाल्या गावचा कारभार हाकण्यास सज्ज

नागेश पाटील 
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

इच्छाशक्ती असेल तर कोणतीही कामे करण्यास अडचण येत नाही. यापूर्वी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभव पाठीशी आहे, असे आत्मविश्‍वासपूर्ण उद्‌गार शेवंती बब्या पवार या ७० वर्षाच्या आजीने काढले. ओवळीच्या सरपंचपदावर निवड झाल्यानंतर त्या आत्मविश्‍वासाने बोलत होत्या.

चिपळूण :  इच्छाशक्ती असेल तर कोणतीही कामे करण्यास अडचण येत नाही. यापूर्वी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभव पाठीशी आहे, असे आत्मविश्‍वासपूर्ण उद्‌गार शेवंती बब्या पवार या ७० वर्षाच्या आजीने काढले. ओवळीच्या सरपंचपदावर निवड झाल्यानंतर त्या आत्मविश्‍वासाने बोलत होत्या.

सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत ओवळी ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जमाती आरक्षण पडले. या प्रवर्गातून शेवंती पवार या एकमेव सदस्या बिनविरोध विजयी झाल्या होत्या. त्यामुळे त्या सरपंच झाल्या. उपसरपंचपदी पूर्वीचा सरपंचपदाचा अनुभव असलेले दिनेश शिंदे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते दिनेश शिंदे यांनी हॅट्‌ट्रीक साधली तर प्रभाग क्र. १ मध्ये सदस्य पदाकरिता अनुसूचित जमाती असे आरक्षण पडले होते. येथील आदिवासी समाजाने ७० वर्षीय शेवंती पवार यांना बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला.

तालुक्‍यातील ६४ ग्रामपंचायतीच्या कारभाराची चावी महिलांच्या हाती गेली आहे. ओवळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावविकास पॅनेलने एकहाती सत्ता मिळविली. सरपंच, उपसरपंचाचा पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. आमदार शेखर निकम यांनी पॅनेलच्या सर्व विजयी सदस्यांचे अभिनंदन केले आहे. या वेळी दिनेश शिंदे, निकिता शिंदे, माधवी शिंदे, संपदा बोलाडे, केशव कदम, दीपिका शिंदे यांच्यासह पॅनेलचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

यापूर्वीही होत्या सदस्य
यापूर्वी शेवंती पवार यांनी सदस्यपद भूषविले असल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव आहे. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत ओवळीमध्ये अनुसूचित जमातीसाठी सरपंचपदही आरक्षित झाले, अन आजीच्या बाजूने नशिबाचा कौल मिळाला.

आत्मविश्‍वासाने उत्तर
तालुक्‍यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पवार विराजमान झाल्यावर या कारभार कशा करणार, अशा शंकांना शेवंती पवार यानी आत्मविश्‍वासाने उत्तर दिले. उपसरपंच दिनेश शिंदे हेदेखील गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीतर्फे विकासकामे होण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत, अशी ग्वाहीही दिली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख