अभिनेत्री पायल घोषलाही रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा  - Ramdas Athavale Supports Payal Ghosh | Politics Marathi News - Sarkarnama

अभिनेत्री पायल घोषलाही रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कंगना राणावत प्रमाणे अभिनेत्री पायल घोष यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून पायल यांनी घाबरू नये, असे आश्वासन आठवले यांनी  पायल घोष यांना दिले.आज अभिनेत्री पायल घोष यांच्याशी दूरध्वनीद्वारे  रामदास आठवले यांनी चर्चा केली. लवकरच आपण पायल घोषची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले

मुंबई : अभिनेत्री पायल घोष यांनी सिने निर्माता अनुराग कश्यप यांच्यावर  केलेल्या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून त्वरित त्यांना मुंबई पोलिसांनी अटक करायला पाहिजे होते मात्र आद्याप तशी कारवाई झालेली नाही. याप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.

कंगना राणावत प्रमाणे अभिनेत्री पायल घोष यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून पायल यांनी घाबरू नये, असे आश्वासन आठवले यांनी  पायल घोष यांना दिले.आज अभिनेत्री पायल घोष यांच्याशी दूरध्वनीद्वारे  रामदास आठवले यांनी चर्चा केली. लवकरच आपण पायल घोषची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. 

बॉलिवूड मध्ये स्ट्रगलर्स असणाऱ्या कलाकारांचा निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी गैरफायदा घेण्याचे काही ठिकाणी प्रकार होत असतील तर ते रोखण्यासाठी अभिनेत्री पायल घोष यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. हिंदी सिनेसृष्टीत काही प्रमाणात होत असलेले गैरप्रकार या चौकशीमुळे थांबतील असे आठवले यांनी स्पष्ट केले आहे. 

लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मंडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणावतने मुंबईवर टिका केली नसून राज्यसरकार वर टिका केली आहे. टिका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगना राणावत यांना भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगनाला संरक्षण देईल, असे काही दिवसांपूर्वी आठवले म्हणाले होते. 
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख