Narendra Modi - Rashmi Thackeray
Narendra Modi - Rashmi Thackeray

पंतप्रधानांकडून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. रश्मी ठाकरे यांच्यावर सध्या एचएन रिलायंन्स हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. रश्मी ठाकरे यांच्यावर सध्या एचएन रिलायंन्स हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. PM Modi inquired about Health of Rashmi Thackeray

त्यांना कोविड संसर्गाची लागण झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackaray) यांना फोन करून रश्मी ठाकरेंच्या (Rashmi Thackeray) तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याचे २० मार्च रोजी स्पष्ट झाले. त्यानंतर आता रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर ११ मार्चला मुंबईच्या जेजे रुग्णालयात कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतली होती. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

२३ मार्चला रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. मात्र, लक्षणे नसल्याने त्या 'मातोश्री' निवासस्थानी विलिगीकरणात होत्या. मात्र, त्यांना त्रास होऊ लागल्याने काल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काल पंतप्रधानांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. PM Modi inquired about Health of Rashmi Thackeray

दरम्यान, राज्यात कोरोना रूग्णांचा विस्फोट झाला असून काल ३९,५४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना (Corona) बाधित रुग्णांची एकूण संख्या २८,१२,९८० झाली आहे. तर राज्यात (Maharashtra) मृत्यूने देखील थैमान घातले असून काल तब्बल २२७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com