पंकजा मुंडे म्हणतात...मी महाराष्ट्रापासून दूर जाणार नाही

दादर येथील वसंतस्मृती पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला कार्यकारिणीतले काही नेते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपआपल्या जिल्ह्यातून सहभागी झाले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदी नेते यावेळी उपस्थित होते तर वसंतस्मृती पक्ष कार्यालयातील सभागृहात देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ, कपिल पाटील आणि पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या
Pankaja Munde Says I will be Connected to Maharashtra Only
Pankaja Munde Says I will be Connected to Maharashtra Only

मुंबई : माजी मंत्री पंकजा मुंडे भाजपच्या काही नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरच काल झालेल्या प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीत त्या उशीरा का होईना पण हजर झाल्या. मी कुठेही काम करण्यास तयार आहे. काम करताना मी महाराष्ट्रापासून दूर जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपमध्ये केंद्रीय पातळीवर काम करण्याची पंकजा मुंडे यांची तयारी नाही की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. 

दादर येथील वसंतस्मृती पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला कार्यकारिणीतले काही नेते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपआपल्या जिल्ह्यातून सहभागी झाले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदी नेते यावेळी उपस्थित होते तर वसंतस्मृती पक्ष कार्यालयातील सभागृहात देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ, कपिल पाटील आणि पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या.

परंतु, या राज्य कार्यकारणीच्या बैठकीला पक्षातील नाराज नेते एकनाथ खडसे मात्र कोणत्याच माध्यमातून उपस्थित नव्हते. आगामी काळात राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आहे . कालच्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, बावनकुळे या नेत्यांव्यतिरिक्त कोणाला बोलण्यासाठी वेळ देण्यात आला नव्हता.

पंकजा मुंडे या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने उपस्थित झाल्या. त्यांच्याशी संवाद साधला असता, ''आपल्याला कुठेही काम करण्याची संधी मिळाली तरी आपण ती पार पाडू. मी काम करताना महाराष्ट्रापासून दूर जाणार नाही आहे, मी महाराष्ट्राशी जोडलेलीच असेन,'' असे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, ''राज्यातील कोरोना फैलावामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यात आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवा अशी सूचना वारंवार करूनही हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारच्या या नाकर्त्या कारभाराचा फटका जनतेला बसत आहे,'' असा आरोप माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत बोलताना केला होता. 

तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशीच भारतीय जनता पक्षाने कार्यकारिणी बैठक बोलावून अपशकुन केला. संपूर्ण राज्य श्री. ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करीत असताना भारतीय जनता पार्टी मात्र त्यांना अपशकुन करीत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक राहू द्या, किमान अपशकून तरी करू नका, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com