Neeta Ambani Named in Generous Persons list by American Magazine | Sarkarnama

परोपकारी व्यक्तींच्या यादीत नीता अंबानींचा समावेश

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 जून 2020

जगातील नामवंत परोपकारी समाजसेवकांच्या यादीतकोरोना विरुद्धच्या लढ्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी यांचा समावेश झाला आहे. अमेरिकेच्या 'टाऊन ऍण्ड कंट्री' मासिकाने प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये समावेश असलेल्या नीता अंबानी या एकमेव भारतीय आहेत.

मुंबई : जगातील नामवंत परोपकारी समाजसेवकांच्या यादीतकोरोना विरुद्धच्या लढ्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी यांचा समावेश झाला आहे. अमेरिकेच्या 'टाऊन ऍण्ड कंट्री' मासिकाने प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये समावेश असलेल्या नीता अंबानी या एकमेव भारतीय आहेत.

टिम कुक, ओप्राह विन्फ्रे, लॉरेन पॉवेल जॉब्स, लॉडर फॅमिली, डोनाटेला वर्सास आणि मायकेल ब्लूमबर्ग अशी इतर नावे या यादीमध्ये आहेत. नीता अंबानी यांच्या संकल्पनेतून रिलायन्स फाऊंडेशनतर्फे कोरोनाच्या संकट काळात लक्षावधी गरजूंना मदत करण्यासाठी लाखो गरिबांना अन्नदान, करण्यात आले. त्याचबरोबर सेव्हन हिल्स हे कोविड १९ रुग्णालय उभारण्यात आले.  आपत्कालीन मदतनिधीत सात कोटी डॉलर रिलायन्स फाउंडेशनतर्फे देण्यात आले. या कामांची पावती म्हणून नीता अंबानी यांना हा बहुमान मिळाल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीतर्फे कळवण्यात आले आहे. 

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने कोरोनाचा फैलाव सुरू होण्यापूर्वीच मार्च महिन्यात दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळात १०० खाटांचे कोविड १९ रुग्णालय उभारण्यात आले.  तर एप्रिल महिन्यात येथील खाटांची संख्या २२० पर्यंत वाढवण्यात आली. रिलायन्स फाऊंडेशनने  अन्नसेवा नावाची देशव्यापी खाद्यसेवाही सुरू केली आहे. त्या सेवेच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी लोकांना जेवण पुरवण्यात आले आहे. मुंबईत कोरोना रुग्णांसाठी ऑनलाईन वैद्यकीय सहाय्य, घरात विलगीकरणाची सुविधा, ग्रामीण भागातील नागरिकांना मदत आणि पाळीव प्राणी, भटक्‍या प्राण्यांसाठी आरोग्यसेवा आदी उपक्रमही रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयांतर्फे  सुरू आहेत. त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीजने मास्क आणि पीपीई कीट भारतातच तयार करून स्वदेशी मोहिमेसही मोठाचहातभार लावला आहे.

मदतीसाठी तत्पर राहू
संकटाच्या वेळी देशाच्या हाकेला धावून जाणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.  केवळ कोरोनाच्या काळातच नाही,  तर यापूर्वीही अनेक वेळा रिलायन्स इंडस्ट्री व रिलायन्स फाऊंडेशनने समाजासाठी चांगले काम केले आहे. आम्ही यापुढेही मदतीस तत्पर राहू, अशी प्रतिक्रिया नीता अंबानी यांनी व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख