८ लाखांची लाच; वैशाली झनकर यांना १ दिवसाची कोठडी!

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी वैशाली वीर-झनकर यांनी शिक्षकांच्या वेतन मान्यतेसाठी चालकामार्फत आठ लाखांची लाच स्विकारली. यासंदर्भात त्यांना आज अटक झाली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.
Zankar- veer
Zankar- veer

नाशिक : जिल्हा परिषदेच्या  माध्यमिक शिक्षण अधिकारी वैशाली वीर-झनकर (Vaishali Zankar) यांनी शिक्षकांच्या वेतन मान्यतेसाठी चालकामार्फत आठ लाखांची लाच स्विकारली. (for regularise salary she accepted 8 lacs bribery) यासंदर्भात त्यांना आज अटक झाली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी (She had send in to one day police custody) दिली.

दरम्यान या प्रकरणातील संशयीत आरोपी शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर येवले आणि या प्रकरणातील सूत्रधार व शिक्षक पंकज दशपुते यांना यापूर्वीच प्रत्यक्ष लाच स्विकारताना ताब्यात घेतले होते. त्यांना यापूर्वीच दोन दिवसांची कोठडी देण्यात आली होती. आज त्यांना तेरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शिक्षणाधिकारी वीर-झनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली. मात्र अंधार पडल्याने रात्री महिलेस अटक करू नये असा संकेत असल्याने त्यांना सकाळी पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी त्यांच्या दिराचे हमीपत्र घेण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी श्रीमती वीर- झनकर यांनी पोलिसांना गुंगारा दिला. त्यानंतर पोलिस दोन दिवस त्यांचा शोध घेत होते. आज सकाळी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात नेले. तेथून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. 
....    

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com