भुजबळ कुटुंबियांना अडचणीत  'या' महिलांचे होते भक्कम पाठबळ!

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नुकतेच मुंबई सत्र न्यायालयाने कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये निर्दोषत्व बहाल केले. ते अटकेत असताना स्नुषा शेफाली आणि विशाखा भुजबळ त्यांच्या कुटुंबाचा आधार बनल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना भक्कम आधार दिला.
Shefail
Shefail

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नुकतेच मुंबई सत्र न्यायालयाने कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये निर्दोषत्व बहाल केले.(Court discharged Bhujbal in Maharashtra sadan case) ते अटकेत असताना स्नुषा शेफाली आणि विशाखा भुजबळ त्यांच्या कुटुंबाचा आधार बनल्या. (When they are in jail daughter in law Shefali & Vishakha brvely support family) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule support them fro NCP) यांनी त्यांना भक्कम आधार दिला. याविषयी आज या महिलांनी प्रतिभाताई पवार (Pratibhatai Pawar) आणि खासदार सुळे यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.

छगन भुजबळ यांनी काल पत्रकार परिषद घेऊन' सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही' असे वाक्य बोलून मागच्या पाच वर्षातील घटनाक्रम एका वाक्यात सांगितला. २०१५ पासून सुरु झालेला चौकशी, अटक आणि बदनामीचा फेरा काल अखेर संपला. छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ अटकेत असताना भुजबळ कुटुंबाच्या आधार स्नुषा शेफाली समीर भुजबळ आणि विशाखा पंकज भुजबळ बनल्या होत्या. तर पक्षातून खासदार सुप्रिया सुळे यांचा त्यांना भक्कम मिळाला. 

काल श्री. भुजबळ यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आज छगन भुजबळ यांच्या दोन्ही सुनांनी मुंबईत सिल्व्हर ओक गाठून खासदार सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. 

भुजबळ यांच्यावर जेव्हापासून सूडबुद्धीने कारवाई सुरु झाली, तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि संपुर्ण राष्ट्रवादी पक्ष भुजबळ यांच्या पाठी खंबीरपणे उभे होते. खासदार सुळे या अधूनमधून छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होत्या. अटकेत असताना भुजबळ यांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उचलला होता. 

१६ जून २०१५ रोजी लाचलुचपत विभागाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यापैकी पहिल्यांदा गुन्हा दाखल केला. भुजबळ यांच्या घरी छापे टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर १६ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना ईडीने अटक केली. दोन वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर ४ मे २०१८ रोजी छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला होता. या तीन वर्षांच्या काळात भुजबळ कुटुंबियांनी मात्र खूप काही सहन केले. माध्यमातून रोज होणारी बदनामी, सततच्या चौकशीचा फेरा, छापेमारी यामुळे भुजबळ कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागत होता. यावेळी त्यांना गरज होती मानसिक आधाराची. ती गरज लक्षात घेऊन पवार कुटुंबियांनी त्यांच्याशी सुसंवाद ठेवून धीर देण्याचे काम केले. 

आज छगन भुजबळ आरोपातून मुक्त झाले असले तरी त्यांची न्यायालयीन लढाई सुरुच राहणार आहे. मात्र मागच्या संघर्ष काळात ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार मानन्याचे आणि शत्रूलाही माफ करण्याचे मोठे मन छगन भुजबळ यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच त्यांच्या सुनांनी देखील अडचणीच्या काळात आपल्याला आधार देणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचे आभार व्यक्त केले.
...
हेही वाचा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com