अमृता फडणवीस को गुस्सा क्यों आया?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करायचा झाल्यास विरोधकांचे टार्गेट असतात फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची अॅक्सिस बँकेतली नोकरी आणि या बँकेत पूर्वी जमा होणारे पोलिसांचे पगार. यावरुन आता अमृता फडणवीस चांगल्याच वैतागल्या आहेत
Amruta Fadanavis
Amruta Fadanavis

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करायचा झाल्यास विरोधकांचे टार्गेट असतात फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची अॅक्सिस बँकेतली नोकरी आणि या बँकेत पूर्वी जमा होणारे पोलिसांचे पगार. यावरुन आता अमृता फडणवीस चांगल्याच वैतागल्या आहेत. प्रत्येक वेळी माझ्या नोकरीवरच का घसरता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अमृता फडणवीस यांनी एका ट्वीटद्वारे मनातली ही व्यथा मांडली आहे. ''प्रत्येक वेळी कुठलेही वक्तव्य माझी अॅक्सिस बँकेतली १८ वर्षांची नोकरी आणि पोलिसांचे या बँकेतले पगाराचे खाते यावरच कशी नेले जाते? तुमची पगाराची खाती अॅक्सिस बँकेत (पूर्वीची युटीआय बँक) किती वर्षांपासून आहेत हे कधी कुणी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना किंवा अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारले आहे काय,'' असा सवाल करणारे संतप्त ट्वीट त्यांनी केले आहे. एका युजरने याबाबतचा मुद्दा ट्वीटरवरुन मांडल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्याला ट्वीट करुन उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या पोलीस कर्मचाऱ्यांची पगाराची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बॅंकेत वळवल्याचा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर विरोधकाकडून अधूनमधून करण्यात येतो. अमृता फडणवीस यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. "माझे देवेंद्र यांचे लग्न होण्याच्या खूप आधी पासून ही खाती अॅक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होते.  ही खातं परत इतर बँकांमध्ये वळवून सरकार देवेंद्र आणि मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे,'' असे अमृता फडणवीस यांनी म्हटले होते. 

याबाबत अॅक्सिस बँकेनेही खुलासा केला होता. "मुंबई पोलिसांची पगार खाती सुमारे पंधरा वर्षांपासून अॅक्सिस बँकेत आहेत. याबाबतचा करार २००३ मध्ये झाला होता. तसेच महाराष्ट्र सरकारशी काॅर्पोरेट सॅलरी खात्यांबाबतचा करार २००७ मध्ये करण्यात आला होता,'' असे त्यावेळी बँकेच्या वतीने सांगण्यात आले होते. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com