संतप्त ग्रामस्थांनी वडेट्टीवारांना अडवले... तर वडेट्टीवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले

तुम्ही काय झोपला होता काय.....
Vijay Vadettiwar was angry with the officer who said that the panchnama was incomplete
Vijay Vadettiwar was angry with the officer who said that the panchnama was incomplete

सिंधुदुर्ग  ः तौक्ते चक्री वादळामुळे (Cyclone Taukte) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) हे आज कोकणच्या (Konkan) दौऱ्यावर होते. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील पाहणी केल्यानंतर वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत अपूर्ण पंचानाम्याच्या मुद्यावर वडेट्टीवार हे अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. काम अजून अपूर्ण आहे, म्हटल्यावर तुम्ही काय झोपला होता काय, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यास सुनावले. (Vijay Vadettiwar was angry with the officer who said that the panchnama was incomplete)

अपूर्ण पंचानाम्यावरून मंत्री वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले, तर तिकडे पाहणी करताना मालवणच्या देवबाग भागातील संतप्त नागरिकांनी वडेट्टीवार यांची गाडी अडवली.  ज्या भागात नुकसान झाले आहे, तिकडे पाहणी केली जात नाही. तसेच, मदत कधी मिळणार, असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी मंत्र्यांना केला.  

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी केली. त्यानंतर आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे कोकणाच्या पाहणी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी मंत्री येत नाहीत. मग त्यांच्या दौऱ्याचा आम्हाला काय उपयोग, असा सवाल नुकसानग्रस्त ग्रामस्थांना केला आहे. 

वडेट्टीवार यांनी आज मालवण तालुक्यातील तारकली, देवबाग, वायरी, वेंगुर्ले, निवती या भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक उपस्थित होते. चक्री वादळामुळे घराचं आणि फळ बागांचे मोठं नुकसान झालं आहे. पाहणीनंतर वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात नुकसानाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. 

या बैठकीत अजून काही पंचनामे कृषी विभागाकडून होण्याचे बाकी आहेत, असे कृषी अधिकाऱ्याने सांगितले. त्यावर विजय वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. आक्रमक होत ते म्हणाले की, काय तुमचा अभ्यास अजून झाला नाही. तुम्ही झोपला होता का. मंत्रांच्या समोर बसताना सर्व माहिती आणि अभ्यास करत जावा, असे खडेबोल त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. 


देवबागमध्ये वडेट्टीवारांच्या गाड्यांचा ताफा अडवला  

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या गाड्यांचा ताफा देवबाग भागात ग्रामस्थांनी अडवला. त्यानंतर किल्ले निवती भागात पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणीही ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. मंत्री येतात, मात्र मदत केव्हा मिळेल, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी मंत्री वडेट्टीवार यांना केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com