खासदार विनायक राऊतांनी नुसती समाजसेवाच करायची का?

राऊत यांच्या विकास कामांपुढे काहीच चालत नसल्याने येणं-केन प्रकारे बदनाम करणे, हा उद्योग सध्या सुरु केला आहे.
Should MP Vinayak Raut only do social service? : Atul Bange
Should MP Vinayak Raut only do social service? : Atul Bange

कुडाळ : लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार विनायक राऊत यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात सातत्याने कोट्यवधींची विकास कामे केली आहेतर; म्हणूनच ते विक्रमी मतांनी विजयी होऊन दोनवेळा खासदार झाले आहेत. परंतु त्यांनी व्यवसाय न करता नुसती समाजसेवाच करावी का? हा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे, असे सडेतोड उत्तर शिवसेनेचे अतुल बंगे यांनी विरोधकांना दिले आहे. 

खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या व्यवसायावरून विरोधकांनी टीका केली आहे. या पार्श्‍वभूमीवर अतुल बंगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खासदार राऊत यांच्यावर कायमच गरळ ओकण्याचे काम विरोधक करत आहेत. जहरी टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे सध्या धंदे नाहीत. खासदार राऊत हे बॅ. नाथ पै,  प्रा. मधु दंडवते यांच्या पावलावर पाऊल ठेऊन लोकसभेत वाटचाल करीत आहेत. 

दिल्लीत संसदेत त्यांनी लोकप्रिय खासदार म्हणून किताब मिळविला आहे. संपूर्ण मतदार संघात कोट्यवधीचा निधी आणून विकासकामे जलदगतीने केली आहेत. याचा पोटशूळ विरोधकांमध्ये उठला आहे. लोकांची सेवा करीत असताना खासदार राऊत यांनी आपल्या घरावर तुळशीपत्रे ठेवावीत, असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.

एखादी कंपनी मुलांसाठी रजिस्टर करणे आणि एक नंबर व्यवसाय करणे हा काय गुन्हा आहे का? कायमच शिवसेनेवर गरळ ओकून समाधान मानून खासदार राऊत यांची बदनामी करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करणे, हा त्यांचा प्रयत्न हास्यास्पद आहे. खासदार राऊत यांची असलेली लोकप्रियता ही कधीच कमी होत नाही, उलट वाढतच चालली आहे, याचे भान विरोधकांनी ठेवावे, असेही बंगे यांनी पत्रकात म्हटले आहे. 

ते पुढे म्हणाले की, खासदार, आमदार यांनी आपला व्यवसाय करणे म्हणजे गुन्हा नाही; परंतु आपण निवडून आल्यावर लोकांना छळणे, हे मात्र शिवसेना लोकप्रतिनिधींनी कधीच केले नाही. जे टीका करणारे आहेत, त्यांची खासदार विनायक राऊत यांच्या विकास कामांपुढे काहीच चालत नसल्याने येणं-केन प्रकारे बदनाम करणे, हा उद्योग सध्या सुरु केला आहे. तो यापुढे बंद करावा, असा सल्लाही अतुल बंगे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com