कोकणात भाजपचा शिवसेनेला दे धक्का

शिवसेनेचा विरोध असताना थेट संघटनाविरोधी भूमिका घेत जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांनी रिफायनरीचे जाहीर समर्थन केले हेाते.
Shiv Sena Zilla Parishad member Manda Shivalkar joins BJP
Shiv Sena Zilla Parishad member Manda Shivalkar joins BJP

रत्नागिरी : नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत रत्नागिरी येथील अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. अनेक बड्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी याच मुद्यावरून शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे पसंत केले आहे. शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या  मंदा शिवलकर यांनी आज (ता. १९ जुलै) भाजपमध्ये जाहीररित्या प्रवेश केला. त्याशिवाय चार माजी शाखा प्रमुखांसह गोवळचे सरपंच अभिजित कांबळे, उपसरपंच प्रिया रोकडे, अन्य ग्रामपंचायत सदस्य यांसह मिठगवाणे, सागवे, कात्रादेवी, गोठीवरे, घोडेपोई, मिठगवाणे, बुरंबे येथील रिफायनरी समर्थक शिवसैनिकांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. (Shiv Sena Zilla Parishad member Manda Shivalkar joins BJP)

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारणीला शिवसेनेचा विरोध असताना थेट संघटनाविरोधी भूमिका घेत जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांनी रिफायनरीचे जाहीर समर्थन केले हेाते. 

भाजपचे प्रदेश सचिव आणि रत्नागिरी जिल्हा प्रभारीनेते माजी आमदार प्रमोद जठार आणि जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश सोहळा झाला. शिवसेनेकडून रिफायनरीला प्रकल्प उभारणीला विरोध केला जात असताना त्याबाबत नाराजी व्यक्त विकासासाठी रिफायनरीचे समर्थन करीत गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक शिवसैनिक आणि सेनेच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत जिल्हा परिषद सदस्य शिवलकर यांच्यासह अनेक गावांमधील शिवसैनिकांनी आज सेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांना प्रवेश देत जठार आणि अ‍ॅड. पटवर्धन यांनी त्यांचे स्वागत केले. 

शिवसेनेकडून नाणार हद्दपारीची घोषणा केली जात असताना शिवलकर यांनी रिफायनरीचे जोरदार समर्थन केले होते. त्यानंतर त्यांची सेनेतून हकालपट्टीची घोषणाही करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांचे रिफायनरी समर्थन कायम राहिले होते. त्यांनी अनेक शिवसैनिकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तालुक्यामध्ये भाजपसह रिफायनरी समर्थकांची ताकद आता वाढली आहे.

भाजपताच येताच पदांची खैरात    

या पक्षप्रवेशाच्यावेळी शिवसेनेतून भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले राजा काजवे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी, गोवळचे सरपंच अभिजीत गणपत कांबळे यांची अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून त्याची आज घोषणा करण्यात आली.
 
 गोवळ ग्रामपंचायत आली भाजपच्या ताब्यात

गोवळग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नऊ सदस्यसंख्या असलेल्या गोवळ ग्रामपंचायतीवर सहा सदस्यीय गावपॅनेलचे वर्चस्व आहे. या पॅनेलचे सरपंच अभिजित कांबळे, उपसरपंच प्रिया रोकडे, सदस्य प्रशांत गुरव, संतोष गुरव, प्रज्ञा गोखले, समिधा कातळकर यांच्यासह जयवंत गुरव, गोपाळ पिठलेकर, अंकुश घाडी, प्रकाश पळसमकर, रविंद्र कदम, तेजस भाटले, सायली मयेकर, विश्वनाथ सोगम, सोनल भाटले, विनायक बंडबे, विनायक जोशी, अविनाश जोशी, राकेश जोशी आदींनी प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे गोवळ ग्रामपंचायतीवर आता भाजपचे कमळ फुलले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com