Sharas Pawar will explain to Rahul Gandhi, trust Hasan Mushrim | Sarkarnama

राहुल गांधींना शरद पवार समजावून सांगतील, हसन मुश्रीफ यांना विश्वास

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

भारत-चीन संघर्षप्रकरणी दररोज राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आहे.

मुंबई : भारत-चीनच्या मुद्यावर राहुल गांधी फार आक्रमकपणे प्रश्न विचारतायत. आमचं त्यावर काही म्हणणं नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुल गांधींवर टीका केली नाही. त्यांना पवार समजावून सांगतील असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 

भारत-चीन संघर्षप्रकरणी दररोज राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आहे. मात्र उभय देशामध्ये झालेल्या कराराची माहिती घेऊन विधान करावे असा सल्ला श्री. पवार यांनी त्यांना दिला होता. या सल्ल्यानंतर कॉंग्रेसचे काही नेते नाराज आहेत. मात्र श्री. पवार यांनी राहुल यांच्यावर टीका केलेली नाही असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, की या मुद्यावर राहुल फार आक्रमकपणे प्रश्न विचारतायत कालच्या नरेंद्र मोदींच्या भाषणावर तर त्यांनी शेरोशायरीतून प्रश्न विचारला आहे त्याबद्दल आमचं काही मत नाही. द्विपक्षीय कराराबद्दल श्री.पवार बोलले होते, त्यात शस्त्र हाती घ्यायची नाहीत असं त्यांना म्हणायचे होते. त्यांनी राहुल गांधींवर टीका केली नाही. त्यांना पवार समजावून सांगतील. गांधी ज्या आक्रमकपणे बोलतायत, ते फार चांगलं काम करतायत 

दरम्यान, कोरोनाच्या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याची संधी ग्रामविकास विभागाला मिळाली आहे. कोरानाच्या काळात आमच्या विभागाने महिला बचतगटांना ऑनलाईन मार्केट उपलब्ध करून दिले आहे. ऍमेझॉन, फिल्पकार्ट या ऑनलाइन विक्री करणाऱ्या पोर्टलवर बचतगटांच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

मे महिन्यापासून ही ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. महिला बचतगटांना यामुळे जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. महिला बचतगट आता जोडले गेलेले आहेत, त्यात वाढ करण्याचा ग्रामविकास विभागाचा प्रयत्न आहे. बचतगटांनी 85 लाख मास्कची निर्मिती केली असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख