मराठा आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकर उतरणार मैदानात - Prakash Ambedkar will participate in agitation with Sambhajiraje for maratha reservation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मराठा आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकर उतरणार मैदानात

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 जून 2021

खासदार संभाजीराजे यांनी नुकतीच प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली होती.

पुणे : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतदी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. उद्या (ता. 16) कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून आंदोलनाला सुरूवात होणार आहे. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हेही सहभागी होत मराठा आरक्षणाला जाहीरपणे पाठिंबा देणार आहेत. (Prakash Ambedkar will participate in agitation with Sambhajiraje for maratha reservation)

खासदार संभाजीराजे यांनी नुकतीच प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीमध्ये संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावर आंबेडकरांशी चर्चा केली होती. त्यानंतर उद्या आंबेडकर आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरला जाणार असल्याने या भेटीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून उद्यापासून आंदोलनाला सुरूवात करणार आहेत. 

हेही वाचा : भाजपच्या 24 आमदारांची राज्यपालांसोबतच्या बैठकीला दांडी; घरवापसीची शक्यता

संभाजीराजे यांची भेट झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत राजकीय गुगली टाकली होती. राज्यातील सध्याच्या राजकारणात शिळेपणा आलेला आहे. त्यामुळे राजकारणात ताजेपणा आणण्याची आवश्यकता आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर आगामी काळात राज्यातील राजकारणात नक्कीच ताजेपणा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. 

एवढेच नाही तर संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घेतला तर मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचे नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे, असे वक्तव्य अॅड. आंबेडकर यांनी केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता दोनच पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय म्हणजे न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि दुसरा ही याचिका जर फेटाळली गेली तर दुसरी याचिका दाखल करणे. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असे आंबेडकर म्हणाले होते. 

संभाजीराजे यांनी पुण्यात उदयनराजे यांचीही भेट घेतली. ही भेटही ऐतिहासिक ठरली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट संभाजीराजेंनी घेतली आहे. त्यांनी सरकारपुढे काही प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पण अद्याप सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने ते उद्यापासून आंदोलनाला सुरूवात करणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख