पीआय पत्कींची चौकशी शिवसेनेच्याच एक मंत्र्यांने थांबवली : रामदास कदमांचा रोख कोणाकडे? 

तुमच्यावर कोणाचा दबाव नसेल, तर या अधिकाऱ्यावर कारवाई करा.
One of Shiv Sena ministers stopped the inquiry of PI Patki: Ramdas Kadam
One of Shiv Sena ministers stopped the inquiry of PI Patki: Ramdas Kadam

खेड (जि. रत्नागिरी) : शिवसेना नेते आणि माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यावर आरोप करून सरकारला घरचा आहेर दिला. तो मंत्री कोण, याची चर्चा सुरू असून जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. रामदास कदम यांनी पत्की यांच्यावर टीका करीत कोणावर निशाणा साधला, याचीच चर्चा यामुळे होती. 

शिवसेना नेते रामदास कदम यांनी पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या कारभाराविरोधात सरकार दरबारी तक्रारी केल्या होत्या. याबाबत चौकशी सुरू झाली होती. मात्र, आमच्याच एका मंत्र्यांनी गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन पत्की यांची चौकशी थांबवली, असे कदम यांनी सांगितले.

मी गेली 31 वर्षे राजकीय क्षेत्रात आहे. मात्र, असा प्रकार केव्हा पाहिला नाही. तुमच्यावर कोणाचा दबाव नसेल, तर या अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे त्यांनी केली होती. 

सभागृहात बोलताना कदम म्हणाले, जिल्ह्यात मनाई आदेश व रात्रीची संचारबंदी सुरू असताना डे-नाईट क्रिकेट स्पर्धांना परवानगी दिली जाते. उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांचे नाव छापले जाते. स्वतः पोलिस निरीक्षक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात.

जिल्ह्यात कोरोनाचा हॉट स्पॉट असताना शेकडो लोक विनामास्क एकत्रित या स्पर्धांना उपस्थित राहतात. सामाजिक अंतर व मास्क सक्तीच्या नियमांचे उल्लंघन होते आणि यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. 

खेड तालुक्‍यात गावठी दारू, जुगार व मटका यांसारखे अवैध धंदे तेजीत सुरू आहेत. याबाबत तक्रारी आपण स्वतः सरकारकडे केल्या होत्या. मात्र, कोणत्याही प्रकारची कारवाई पोलिस निरीक्षक पत्की यांच्यावर झाली नाही.

पत्की पोलिस ठाण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामस्थांच्या अंगावर धावून जातात. आरडाओरडा करतात, याबाबत तक्रार दिली आहे. कदम यांनी आज पुन्हा सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा गृहमंत्र्यांनी पत्की यांच्या बदलीची घोषणा केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com